Shraddha Thik
काही गोष्टींबद्दल अतिविचार करणे आणि काळजी करणे पूर्णपणे सामान्य आहे.
तुम्ही सामान्य आणि सतत विचार यातील फरक समजून घेतला पाहिजे, कारण ते तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला हानी पोहोचवू शकते.
येथे आम्ही तुम्हाला काही पद्धतींबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमची अतिविचार करण्याची सवय दूर होऊ शकते.
एका नोटमध्ये जास्त तणावपूर्ण ते कमी तणावपूर्ण असे विचार लिहिणे. नंतर कमी तणावपूर्ण विचारांबद्दल जास्त विचार करणे किंवा काळजी करणे थांबवण्याचा प्रयत्न करा असेच हळूहळू सगळ्या विचारांना थांबवा.
स्वतःशी खरे असणे महत्त्वाचे आहे. याचे कारण असे की जेव्हा आपण आपल्या भावना दाबून ठेवतो, तेव्हा त्यांचा आपल्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो आणि तणाव तसेच नैराश्याचा धोका वाढतो.
जेव्हा आपण वर्तमानावर लक्ष केंद्रित करू लागतो, तेव्हा आपण भूतकाळातील नकारात्मक अनुभवांबद्दल विचार करणे थांबवतो.
रात्री चांगली झोप घेतल्याने तुमच्या मनालाही विश्रांती मिळते.