RBI FD Rules: बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! FD मध्ये होणार मोठा बदल, RBI कोणता नियम आणतंय?

Fixed Deposit Interest Rates: आरबीआयने बॅंकांना एफडी आणि इतर ठेवींवरील व्याजदर वेबसाइटवर जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे ग्राहकांना व्याजादरांची तुलना करणं सोपं होणार आहे.
RBI FD Rules
RBI FD Rulesgoogle
Published On

प्रत्येकजण पैशाची बचत करत असतो. काहीजण हेच पैसे एफडीत गुंतवतात आणि भविष्यात त्याचं व्याज मिळवतात. पण काही बॅंकांचं व्याज ठरलेलं नसतं. बऱ्याचदा याची माहितीही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध नसते. मात्र आता भारतीय रिझर्व्ह बॅंक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

एफडीमध्ये मोठा बदल होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक (RBI) ने महत्वाच्या नियमांचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये तुमचं फिक्स डिपॉझिट आणि बॅंकेच्या डिपॉझिटचं व्याज वाढू शकतं. कारण बऱ्याचदा बॅंका तुम्हाला गुंतवणुकीच्या कालावधीनुसार किती व्याज मिळेल हे सांगत नाहीत. आता हे अधिकृतपणे सांगणं अनिवार्य आहे. याने गुंतवणुकदारांना विविध बॅंकांच्या व्याजाची तुलना करणं सोपं होईल.

RBI FD Rules
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, 'ही' २ कामं आताच करा, अन्यथा २००० रुपयांचा हप्ता होणार बंद; पीएम किसान योजनेचे मोठे अपडेट

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने मांडलेला प्रस्ताव सार्वजनिक मतांच्या निर्णयावर अवलंबून असेल. याचा उद्देश हा गुंतवणुकदारांना त्यांचं मोठ्या रकमेवरील व्याज ठरवण्यासाठी आणि जमा झालेलं व्याजाचे दर पाहण्यासाठी होईल. तुम्ही तुमचं मत २० जूनपर्यंत मांडू शकता.

आरबीआयने दिलेल्या प्रस्तावानुसार बॅंकांचं काम सुरु करण्याआधी त्यांच्या वेबसाइटवर जमा व्याजाचे दर तिथे दाखवणं गरजेचं आहे. या नियामनुसार जमा रकमेवरचं देय व्याजाचे दर हे कामाकाजाचा दिवस सुरु होण्याआधीच बॅंकांच्या वेबसाइटवर जाहीर केलेल्या व्याजदरांवर आधारित असेल.

म्हणजेच बॅंक FD आणि इतर योजनांचे व्याजाचे दर आता सार्वजनिक करतील. त्याने ग्राहकांना विविध बॅंकाशी तुलना करणं सोपं पडेल. या निर्णयामुळे व्याजाच्या दरांबद्दल ग्राहकांना कोणतीच शंका राहणार नाही. त्याने एफडीत गुंतवणुक करणाऱ्या ग्राहकांनाही फायदा होईल. तर मोठी गुंतवणुक करणाऱ्यांसाठी वेगळा नियम आहे. त्यावर बॅंका व्याजाबद्दल स्वतंत्र निर्णय घेतील.

RBI FD Rules
Gold Rate Today : सोनं 1.53 लाखांच्या पार, मुंबई-पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर किती? वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com