Escort MPT JAWAN Tractor : शेतकऱ्यांच्या कामासाठी जवान आहे बेस्ट; जाणून घ्या मायलेज, फीचर्स

Escort Tractor : जर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एस्कॉर्ट्स एमपीटी जवान ट्रॅक्टर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. या ट्रॅक्टरमध्ये २५ हार्स पावर निर्माण करणारे शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. जे शेतीशी संबंधित कठीण कामे सहजपणे पूर्ण करण्यास सक्षम आहे.
Escort  Tractor
Escort TractorEscort Tractor MPT
Published On

Escort MPT JAWAN Tractor Features:

जर तुम्हाल शेतीची कामे सुलभरित्या करायचे असतील तर एमपीटी जवान तुमच्या कामात येईल. 'जवान' कोणी व्यक्ती नाहीतर एक शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. तुम्ही जर ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एस्कॉर्ट्स एमपीटी जवान ट्रॅक्टर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. या ट्रॅक्टरमध्ये २५ हार्स पावर निर्माण करणारे शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. यामुळे शेतीसंबंधित अवजड कामे सहजपणे पूर्ण करण्यास सक्षम आहे. (Latest News)

शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारची कृषी यंत्रे आणि उपकरणे वापरली जातात, त्यापैकी ट्रॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. शेतीची कामे कमी वेळेत पूर्ण करायची असतील तर ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे. बहुतेकांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे. पण कोणता ट्रॅक्टर शेतीसाठी उपयोगी पडले आणि आपल्या बजेट राहील याची कल्पना अनेक शेतकऱ्यांना नसते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आमच्याकडे त्याचे उत्तर आहे. जर तुम्ही शेती सुलभ करण्यासाठी शक्तिशाली ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एस्कॉर्ट्स एमपीटी जवान ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये २५ हॉर्स पावर निर्माण करणारे शक्तिशाली इंजिन आहे, जे कठीण आणि आव्हानात्मक कार्ये करण्यास सक्षम आहे. एस्कॉर्ट्स एमपीटी जवान ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये काय आहेत. इतका भारी ट्रॅक्टरची किमत काय आहे, तो तुमच्या बजेटमध्ये येईल का याची सर्व माहिती घेऊ.

एस्कॉर्ट एमपीटी कंपनी तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये दोन सिलेंडरमध्ये वॉटर कूल्ड इंजिन देते. जे २५ हॉर्स पावर (एचपी) पावर निर्मित करते. या ट्रॅक्टरमध्ये ऑइल बाथ टाइप एअर फिल्टर देण्यात आले आहे, जे इंजिनला सुरक्षित ठेवतं. एस्कॉर्ट कंपनीचा ट्रॅक्टरला ३१.८ kmphचा फॉरवर्ड स्पीड देण्यात आलीय. कंपनीने या ट्रॅक्टरला १३.१ Kmphचा रिव्हर्स स्पीड देण्यात आलाय. प्रतीतासाला ३१ किमीची गती देणाऱ्या या ट्रॅक्टरची इंधन क्षमता ४२ लीटरपर्यंतची दिलीय. यामुळे एकदा इंधन भरलं तर तुम्ही दीर्घकाळापर्यंत शेतीची कामे करू शकतात.

फक्त मायलेज शानदार नाही तर वजन उचलण्यास हे ट्रॅक्टर सक्षम आहे. एस्कॉर्ट्स एमपीटी जवान ट्रॅक्टरला वजन उचलण्याची क्षमता १००० किलो इतकी आहे. जेणेकरून शेतकरी कमी वेळेत अधिक वजनाचा शेतमाल बाजारात सहन घेऊन जाईल. या ट्रॅक्टरचे एकूण वाहन वजन १७६० किलो आहे. हा ट्रॅक्टर अतिशय मजबूत व्हीलबेससह तयार करण्यात आला आहे.

एस्कॉर्ट्स एमपीटी जवान ट्रॅक्टरचे फीचर्स (Escorts MPT Jawan Tractor Features)

एस्कॉर्ट्स एमपीटी जवान ट्रॅक्टरमध्ये मॅन्युअल स्टीयरिंग देण्यात आलीय. या ट्रॅक्टरला ८ फॉरवर्ड प्लस २ रिव्हर्स गिअर बॉक्स देण्यात आलेत. तसेच या ट्रॅक्टरमध्ये ड्राय सिंगल प्लेट टाइप क्लच देण्यात आले आहे. यात Constant Mesh टाइप ट्रांसमिशन देण्यात आले आहे. या एस्कॉर्ट्स ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ड्राय डिस्क ब्रेक्स पाहायला मिळतील.

जे नांगरणी झालेल्या आणि इतर प्रकारच्या जमिनीवर मजबूत पकड कायम ठेवण्यास सक्षम आहेत. कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये 12 V 75 AH बॅटरी दिलीय. एस्कॉर्ट्सच्या या ट्रॅक्टरमध्ये लाइव्ह सिंगल स्पीड प्रकारचा पॉवर टेकऑफ आहे, जे 540 RPM जनरेट करते. हा ट्रॅक्टर 2WD म्हणजेच टू व्हील ड्राईव्हसह बाजारात सादर करण्यात आलाय. यात ६.०० x १६ फ्रंट टायर आणि मागील टायर १२.४ x २८ असे देण्यात आली आहेत.

भारतातील बाजारात एस्कॉर्ट्स एमपीटी जवान ट्रॅक्टरची एक्स-शोरूम किंमत ४.१० लाख ते ४.५५ लाख रुपये ठेवण्यात आलीय. RTO नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या एस्कॉर्ट्स ट्रॅक्टरची ऑन-रोड किंमत सर्व राज्यांमध्ये बदलू शकते. कंपनीने एस्कॉर्ट एमपीटी जवान ट्रॅक्टरला १ वर्षांपर्यंतची वॉरंटी दिलीय.

Escort  Tractor
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवला चार्जिंगवरील प्रदूषण विरहित 'ट्रॅक्टर'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com