सरकारच्या निषेधार्थ राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी स्वतः ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल झाले आहेत.
सरकारच्या निषेधार्थ राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल
सरकारच्या निषेधार्थ राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखलtwitter/@RahulGandhi
Published On

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या (central government) नव्या कृषी कायद्यांचा विरोध (farm bill protest) करण्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (congress leader rahul gandhi) स्वतः मैदानात उतरले आहेत. आज संसद भवनाच्या परिसरात त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत सरकारचा निषेध केला. यादरम्यान त्यांच्यासोबत ट्रॅक्टरवर रणदीप सुरजेवाला आणि दिपेंद्र हुड्डा हे देखील उपस्थित होते. (Rahul Gandhi drives a tractor to protest against the government)

रणदीप सुरजेवाला (randeep surjewala) आणि बी. व्ही. श्रीनिवास (B. V. Shreenivas) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले अणि ट्रॅक्टरही (tractor) जप्त केला. संसदेच्या अधिवेशनाच्या काळात संसद परिसरात कलम १४४ लागू केले जाते. त्यामुळे गर्दी जमवता येत नाही. मात्र या आदोलनामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. राहुल गांधी म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाही. सरकारला या तीन काळ्या कायद्यांना मागे घ्यावेच लागेल. सरकार शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणत आहे. शेतकऱ्यांवर चुकीचे आरोप केले जात आहेत, असंही ते म्हणाले. दरम्यान या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या जंतर - मंतर मैदानात आंदोलन करत आहे.

हे देखील पहा -

सध्या याठिकाणी शेतकऱ्यांची संसद भरत आहे. दरदोज २०० शेतकरी यात सहभागी होतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत ही शेतकऱ्यांची संसद सुरु राहणार आहे. मागील एक वर्षापासून दिल्लीच्या टिकरी, सिंघु आणि गाजीपुर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. संसदेत कृषी कायदा आणि पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ होत असून संसदीय कामकाज ठप्प करावं लागतंय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com