पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवला चार्जिंगवरील प्रदूषण विरहित 'ट्रॅक्टर'

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक मिनी टॅक्टर बनवला आहे. हा संपूर्ण ट्रॅक्टर प्रदूषण विरहित असून त्याचा कसलाही आवाजही होत नाही.
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवला चार्जिंगवरील प्रदूषण विरहित ट्रॅक्टर
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवला चार्जिंगवरील प्रदूषण विरहित ट्रॅक्टरअनंत पाताडे
Published On

सिंधुदुर्ग : साधारणता प्रत्येक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये मुलांना शेवटच्या वर्षामध्ये प्रोजेक्ट करण्यासाठी दिला जातो यामध्ये प्रत्यक विद्यार्थी आपआपली बुद्धीमता वापरुन काहीतरी नविन करुण दाखविण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असातात असाच एक प्रोजेक सिंधुदुर्गमधील मालवण पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रिक शाखेत शेवटच्या वर्षासाठी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी एक प्रोजेक्ट केला आहे.Polytechnic students build pollution free tractor on charging

हा प्रोजेक्ट 14 जणांनी मिळून इलेक्ट्रिक मिनी टॅक्टर बनवला आहे. या ट्रँक्टरच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती विचारली असता त्यां विद्यार्थ्यांनी त्या ट्रँक्टरच्या घडवणीचा कालक्रम सांगितले. प्रथम14 जणांनी पैसे जमवले त्यानंतर आम्ही टाकाऊ वस्तू पासून ट्रॅक्टरचा बनवायचा ठरवला हा संपूर्ण ट्रॅक्टर प्रदूषण विरहित आहे कोणता आवाज येत नाही हा ट्रॅक्टर एकदा चार्ज केल्यानंतर 23 कि मी पर्यत ताशी जाऊ शकतो तर 300 किलो पर्यत वजन वाहू शकतो एवढी वजन क्षमता आहे अशी माहिती हा प्रोजेक्ट मध्ये काम करणाऱ्या सुमित कासले या विद्यार्थ्यांने दिली.

भविष्यात अजून ह्या ट्रॅक्टरला अजून ऍडव्हान्स बनवायचं आहे याला अजून सोव्हर ऊर्जेवर वगरे किंवा अजून वजन 1 टन पर्यत क्षमता कशी वाढवता येईल याकडे भविष्यात प्रयत्न सुरू असल्याचे सुमेध कासले यांने सांगितले.

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवला चार्जिंगवरील प्रदूषण विरहित ट्रॅक्टर
जायकवाडीत सापडलेल्या माशावर का लागली एवढी बोली...

ह्या ट्रॅक्टरला 48 पावरची क्षमता असते त्यासाठी 12 पावरचे 4 बॅटरी या ट्रॅक्टरमध्ये बसविण्यात आले असून त्याला पावर सप्लाय करण्यात आलाय 300 किलो पेक्षा जास्त वजन घेऊन जाऊ शकतो तर हे सगळं बनवायला 35 ते 37 हजार रुपये खर्च आला असल्याची माहिती विद्यार्थी सुमेध जाधव यांने दिली.

या प्रोजेक्टमुळे या विद्यार्थ्यंच्या कल्पक बुध्दीची आणि नवनिर्माणाची चूणूक दिसून आली असं म्हणायला हरकत नाही.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com