PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Inactive PF Account : EPFO च्या नव्या पोर्टलमुळे जुने निष्क्रिय पीएफ खांत शोधणे, शिल्लक तपासणे, सक्रिय UAN मध्ये ऑनलाइन ट्रान्सफर करणे आणि KYC आण क्लेम प्रोसेस जास्त सोपी, जलद व पारदर्शक झाली आहे.
Inactive PF Account
EPFO Updatemeta ai
Published On

जर तुमचं जुनं EPF (Employees' Provident Fund) खातं निष्क्रिय (Inactive) झालं असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने सदस्यांसाठी मोठा दिलासा देणारे नवे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या साहाय्याने सदस्यांना जुनं पीएफ खातं शोधता येणार, शिल्लक रक्कम तपासता येणार आणि ती रक्कम सक्रिय UAN मध्ये ऑनलाइन ट्रान्सफर करता येईल. याबद्दलची माहिती केंद्र सरकारने २७ जुलै रोजी लोकसभेत दिली.

बऱ्याच कर्मचारी नोकरी बदलताना नवीन कंपनीत पीएफ खातं सुरू करतात. मात्र, जुन्या कंपनीतले पीएफ खातं दुर्लक्षित राहतं किंवा त्याची माहिती हरवते. त्यामुळे त्या खात्यातले पैसे निष्क्रिय अवस्थेत राहतात. विशेषत: ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त UAN आहेत, अशा कर्मचाऱ्यांना ही समस्या जास्त भेडसावते.

Inactive PF Account
Ladki bahin Yojana : ऑगस्ट उजाडणार पण जुलैचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींच्या १५०० रुपयांबाबत अपडेट समोर

EPFO चे नवीन पोर्टल आधार-आधारिक (Aadhaar-based) डिजिटल पडताळणीवर आधारित आहे. तुम्ही आधार कार्डाच्यामदतीने तुमची ओळख सत्यापित करून जुने पीएफ खातं शोधू शकतात. पात्र सदस्यांना त्यातील शिल्लक रक्कम त्यांच्या सक्रिय UAN मध्ये ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळेल. तसेच, गरजेचं असल्यास निष्क्रिय खात्यातल्या रकमेवर ऑनलाइन क्लेमही करता येईल.

या पोर्टलमुळे KYC अपडेट करणंही सोपं झालं आहे. सर्व आवश्यक माहिती ऑनलाइन सादर करून तिची पडताळणी करता येते. यामुळे कागदपत्रांची धावपळ, कार्यालयीन फेऱ्या आणि मॅन्युअल प्रोसेसची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याशिवाय पीएफ ट्रान्सफर आणि क्लेम सेटलमेंटची प्रोसेस जास्त जलद आणि पारदर्शक होईल.

Inactive PF Account
Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

मात्र, सरकारने स्पष्ट केलं की, ज्या सदस्यांना त्यांच्या जुन्या पीएफ खात्याची कोणतीही माहिती किंवा तपशील आठवत नाही. त्यांना या पोर्टलचा लाभ मिळणार नाही. हे पोर्टल फक्त स्वत:ची ओळख आधारच्या मदतीने करू शकणाऱ्या आणि उपलब्ध नोंदीच्या आधारे जुने पीएफ खातं ओळखू शकणाऱ्या सदस्यांसाठीच गरजेची आहे. EPFO च्या या नव्या उपक्रमामुळे लाखो कर्मचाऱ्यांना जुनी पीएफ बचत पुन्हा मिळवणे, ती एका खात्यात एकत्र करणे आणि निधीचे व्यवस्थापन जास्त सोपं व सुरक्षितपणे करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com