

महाराष्ट्रातल्या सर्वात प्रसिद्ध असलेल्या मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातल्या लाखो महिलांचे लक्ष लागलं आहे. जुलै महिना संपत आला असला तरी त्या हप्त्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आणि प्रतीक्षा वाढलेली दिसत आहे.
याआधी जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीच्या मदतीने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता १५ ऑगस्टआधी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण या संदर्भात राज्य सरकारकडून अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. शासनाच्या नियोजनानुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता शक्यतो १० तारखेपर्यंत वितरित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, महिला व बाल विकास विभागाने योजनेतले अपात्र आणि दुबार लाभार्थी शोधण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) मोहीम राबवली होती. या पडताळणीनंतर योजनेची अंतिम लाभार्थी यादी करण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी २.६३ कोटी महिलांनी नोंदणी केली होती, तर पहिल्या टप्प्यात २.४७ कोटी महिलांना लाभ मिळाला होता. मात्र ई-केवायसीनंतर आणि पात्रतेची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सुमारे १.६६ कोटी महिला अंतिम पात्र ठरल्या असून ६६ लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार, चारचाकी वाहन असलेल्या, शासकीय सेवेत असलेल्या तसेच पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळ्यात आलं आहे. पडताळणीची प्रोसेस पूर्ण झाल्याने आता तयार झालेल्या प्रमाणित लाभार्थी डेटाबेसच्या आधारे पुढील सर्व हप्ते पाठवण्यात करण्यात येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.