

तुमचाही पीएफ दरमहा जमा होत असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ऑनलाइन पोर्टल सुरू केली आहे. पण यावेळी काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. त्याचा परिणाम थेट कोट्यवधी PF खातेधारकांवर होणार आहे. यामध्ये UAN (Universal Account Number) संबंधित सेवा आता ईपीएफओ पोर्टलवर उपलब्ध राहणार नाहीत.
ईपीएफओच्या नव्या व्यवस्थेनुसार UAN अॅक्टिव्हेशन आण नवीन UAN जनरेट करण्याची सुविधा फक्त UMANG अॅपच्या मदतीनेच करता येणार आहे. या दोन्ही सेवांसाठी आधार Face Authentication अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सदस्यांना जास्त सुरक्षित आणि जलद सेवा मिळण्याचा दावा ईपीएफओने केला आहे.
१. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल अॅप स्टोर वरून UMANG अॅप डाउनलोड करा.
२.अॅपमध्ये ईपीएफ सर्व्हिस हा ऑप्शन निवडा.
३. आता UAN Services Through Face Auth मधल्या UAN Activation वर क्लिक करा.
४. आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा.
५. त्यामध्ये आवश्यक माहिती भरल्यानंतर UAN अॅक्टिव्हेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.
१. UMANG अॅप उघडा आणि EPFO Services निवडा.
२. UAN Allotment and Activation या पर्यायावर क्लिक करा.
३. आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा.
४. स्क्रीनवरील सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवीन UAN तयार होईल.
ईपीएफओने डेटाबेसमध्येही सुधारण्या केल्यामुळे पोर्टलची गती आणि सुरक्षा वाढल्याचे सांगितले आहे. तसेच ज्यांनी आपला UAN क्रमांक विसरला आहे. त्यांच्यासाठी UAN रिस्टोअर करण्याची प्रक्रिया आता जास्त सोपी करण्यात आली आहे. ज्या कर्माचाऱ्यांचे पीएफ खातं आहे. पण त्यांनी आत्तापर्यंत UAN मिळालेला नाही त्यांनी सर्वात आधी नोंदणीकेलेल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करावी. त्यानंतर आवश्यक वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर त्यांना नवीन UAN जारी केला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.