EPFOचा मोठा निर्णय! आता नोकरी सोडल्यावर EPF अकाउंट ट्रान्सफर करणं सोपे; फॉर्म १३ मध्ये महत्त्वाचा बदल

EPFO Decision On EPF Account Transfer: जर तुम्ही नोकरी सोडली अन् नवीन नोकरी जॉइन करत असाल तर तुम्हाला पीएफ अकाउंट ट्रान्सफर करावे लागते. पीएफ अकाउंट ट्रान्सफर करणे आता सोपे झाले आहे.
EPFO
EPFOSaam Tv
Published On

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला ईपीएफओ अकाउंट ट्रान्सफर करणे अजूनच सोपे होणार आहे. यामुळे तुम्हाला पुढे पीएफचे पैसे काढण्यासाठीही काही अडचणी येणार नाही. ईपीएफओने फॉर्म १३ मध्ये बदल केले आहेत. यामध्ये एका एम्प्लॉयरकडून दुसऱ्या एम्प्लॉयरकडे ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर (PF Account Transfer) करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाही.

EPFO
Provident Fund: PF अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले? UNA नंबरशिवाय चेक करा बॅलन्स, फॉलो करा सोप्या टिप्स

मिडिया रिपोर्टनुसार, वर्षभरात एका कोटींपेक्षा जास्त ईपीएफ कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीसाठी जॉइन झाले तर ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करावे लागते. त्यासाठी एम्प्लॉयरची परवानगी महत्त्वाची लागते.

आता डेस्टिनेशन ऑफिससाठी परवानगीची गरज नाही

ईपीएफओ कर्मचाऱ्यांना ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी एम्प्लॉयरच्या परवानगीची गरज नाही. फॉर्म १३ सॉफ्टवेयरमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे सोर्स ऑफिसच्या अप्रुवलनंतर ईपीएफ अकाउंटचे पैसे तुमच्या डेस्टिनेशन ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जातील.

EPFO
Scheme: पत्नीच्या नावावर १ लाख रूपये गुंतवा अन् मॅच्युरिटीवर ₹१६००० व्याज मिळवा, सरकारी योजनेचा जबरदस्त फायदा

ईपीएफ अकाउंट लवकरात लवकर होणार ट्रान्सफर (EPF Account transfer)

एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, ईपीएफओच्या या पाऊलावर पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे. याआधी नोकरी बदलण्यासाठी पीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी सोर्स आणि डेस्टिनेश ऑफिसच्या परवानगीची गरज आहे. या नवीन निर्णयामुळे वर्षाला ९०,००० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यासाठी कोणतीही अडचण होणार आहे.

EPFO
EPFO 3.0 Update: आता ATM मधून काही सेकंदात काढता येणार PF; या तारखेपासून सुरु होणार प्रोसेस; जाणून घ्या सविस्तर

कंपनी UAN नंबर जनरेट करु शकणार

ईपीएफओने कर्मचाऱ्यांना यूएएन नंबर बनवण्याचीही परवानगी दिली आहे. यामुळे एम्प्लॉयर एकसाथ जास्तीत जास्त यूएएन नंबर जनरेट करु शकणार आहेत. यासाठी आधार सीडिंगचीही गरज भासणार नाही.

EPFO
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बेसिक पेन्शन ७५०० रुपये होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com