RBI चा मोठा निर्णय! १० वर्षांची मुले हाताळणार स्वतः चे बँक अकाउंट; पालकांची गरजच नाही

RBI Decision Of Minor Allowed To Open Bank Account: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांना स्वतः चे अकाउंट उघडून ते ऑपरेटदेखील करता येणार आहे.
RBI
RBISaam Tv
Published On

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने आता १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील अल्पवयीने मुलांना स्वतः चे बँक अकाउंट उघडण्याचा आणि ते ऑपरेट करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत पीटीआयने माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. याआधी अल्पवयीन मुलांचे बँक खाते त्यांचे पालक उघडायचे आणि तेच ऑपरेट करायचे.

कोण उघडू शकणार स्वतः चे बँक अकाउंट?

आरबीआयनुसार, १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुले स्वतः चं बचत खाते आणि टर्म डिपॉझिट अकाउंट उघडू शकणार आहेत. याचसोबत हे अकाउंट ऑपरेटदेखील करु शकणार आहे. ही सुविधा बँकेच्या रिस्क मॅनेजमेंट पॉलिसीवर आधारित असणार आहे.

ही सुविधा कोणत्या अटी-शर्तींवर द्यायची आहे याचा निर्णय बँक घेणार आहे. याबाबत बँक सर्व माहिती खातेधारकांना देणार आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, बँकांना हे सुनिश्चित करावे लागेल की, अल्पवयीन मुलाच्या खात्यातून पैसे काढले जाणार नाहीत. त्या अकाउंटमध्ये नेहमी पैसे असायले हवेत. खाते उघडण्यापू्र्वी त्या मुलाची योग्य चौकशी करणे ही बँकेची जबाबदारी आहे. खातेधारक १८ वर्षांचा झाल्यावर त्याला बँकेच्या ऑपरेटिंग सूचना आणि सही करुन पून्हा नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.

१० वर्षांपेक्षा मोठ्या खातेधारकांना या सुविधा मिळणार

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बँका अल्पवयीन मुलांना इंटरनेट बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, चेक बुक यांसारख्या सुविधा देऊ शकतात. हे सर्व बँकेच्या धोरणांवर अवलंबून असेल. १ एप्रिल २०२५ पर्यंतच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार नवीन धोरणे बनवण्यास किंवा सध्याच्या धोरणांमध्ये सुधारणे करण्यास आरबीआयने बँकांना सांगितले आहे.

मूलाचे वय १० वर्षांपेक्षा कमी असेल तर

जर मुल १० वर्षांपेक्षा कमी असेल तर तेदेखील खाते उघडू शकतात.फक्त हे बँक अकाउंट पालकांमध्ये चालवण्यात येईल.

RBI
Scheme: पत्नीच्या नावावर १ लाख रूपये गुंतवा अन् मॅच्युरिटीवर ₹१६००० व्याज मिळवा, सरकारी योजनेचा जबरदस्त फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com