Provident Fund: PF अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले? UNA नंबरशिवाय चेक करा बॅलन्स, फॉलो करा सोप्या टिप्स

Check Your PF Balance Without UAN: पीएफच्या अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले आहेत हे चेक करायचे आहे पण तुमच्याकडे यूएनए नंबर नाही. असे असेल तर टेन्शन घेऊ नका. कारण यूएनएशिवायय देखील तुम्ही पीएफ चेक करू शकता.
Provident Fund: PF अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले?  UNA नंबरशिवाय चेक करा बॅलन्स, फॉलो करा सोप्या टिप्स
Check Your PF Balance Without UANSaam Tv
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO द्वारे सर्व नोकरी करणाऱ्यासाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ सुविधा प्रदान केली जाते. यासाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून दरमहा काही पैसे कापले जातात. जेणेकरून निवृत्तीनंतर हे पैसे त्याच्यासाठी उपयोगी ठरू शकतील. जेव्हा तुम्ही पीएफ खाते उघडता तेव्हा ईपीएफओकडून तुम्हाला १२ अंकी क्रमांक दिला जातो. त्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN म्हणतात. तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये किती बॅलेन्स जमा झाला हे चेक करण्यासाठी तुम्हाला यूएनए नंबरची आवश्यकता असते.

तुम्हाला तुमचा पीएफ अकाऊंटमधील बॅलन्स तपासायचा असेल, पासबुक डाउनलोड करायचा असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल, पीएफशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या कामासाठी यूएएन नंबर असणे आवश्यक आहे. पण हा नंबर लक्षात ठेवणे नेहमीच सोपे नसते. अशामध्ये जर यूएनए नंबर तुमच्या लक्षात नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटमधील बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही फक्त काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतली.

Provident Fund: PF अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले?  UNA नंबरशिवाय चेक करा बॅलन्स, फॉलो करा सोप्या टिप्स
EPFO 3.0 लवकरच होणार लाँच; PF चे पैसे ATM मधून पैसे काढणे ते क्लेम सेटलमेंट सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ९९६६०४४४२५ या नंबरवर मिस्ड कॉल करा. तुम्हाला EPFO ​​कडून तुमचा UAN नंबर असलेला एसएमएस मिळेल. यासोबतच तुम्हाला तुमच्या अकाऊंटमधील शिल्लक बॅलेन्सची माहिती देखील मिळेल. एसएमएसद्वारे तुमचा पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून सर्वात आधी ७७३८२९९८९९ वर मेसेज पाठवा. तुम्हाला ज्या भाषेत माहिती हवी आहे ती भाषा सांगा. जसे की हिंदी भाषेसाठी EPFOHO UAN HIN, पंजाबीसाठी EPFOHO UAN PUN, गुजरातीसाठी EPFOHO UAN GUJ, मराठीसाठी EPFOHO UAN MAR. म्हणजेच तुम्हाला EPFOHO UAN नंतर तुमच्या भाषेची पहिली तीन अक्षरे लिहावी लागतील. थोड्याच वेळात तुम्हाला तुम्ही पाठवलेल्या भाषेत एक एसएमएस मिळेल.

Provident Fund: PF अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले?  UNA नंबरशिवाय चेक करा बॅलन्स, फॉलो करा सोप्या टिप्स
आता काही सेकंदातच काढता येणार PF चे पैसे, EPFO 3.0 नक्की आहे तरी काय?

महत्वाचे म्हणजे, तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. या सेवेसाठी तुमचा UAN नंबर सक्रिय असणे आवश्यक आहे. बँक अकाऊंट आधार आणि पॅनशी जोडलेले असले पाहिजे. तरच ही सेवा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. जर UAN लिंक केलेला नसेल तर तुम्हाला सेवा मिळविण्यासाठी eKYC पडताळणी पूर्ण करावी लागेल.

तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरसोबत देखील संपर्क करू शकता . तुम्ही त्यांना तुमची पगाराची स्लिप मागू शकता, ज्यामध्ये UAN क्रमांक लिहिलेला असतो. नाही तर तुम्ही यासाठी तुमच्या एचआर किंवा पेरोल डिपार्टमेंटशी देखील बोलू शकता आणि त्यांच्याकडून यासंदर्भात माहिती मागवू शकता.

Provident Fund: PF अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झाले?  UNA नंबरशिवाय चेक करा बॅलन्स, फॉलो करा सोप्या टिप्स
PF Account: ईपीएफओने बदलला नियम, आता डॉक्युमेंटशिवाय प्रोफाइल अपडेट होणार, पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com