EPFO 3.0 लवकरच होणार लाँच; PF चे पैसे ATM मधून पैसे काढणे ते क्लेम सेटलमेंट सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार

EPFO 3.0 Update: ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी आहे. आता लवकरच EPFO 3.0 सेवा लाँच होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसाठी पीएफसंबंधित सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत.
EPFO
EPFOSaam Tv
Published On

ईपीएओ सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना आता कोणत्याही पीएफसंबंधित कामासाठी ऑफिसमध्ये जायची गरज भासणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांसाठी मोठी अपडेट आणली आहे. आता लवकरच EPFO 3.0 लाँच होणार आहे.

या नवीन EPFO 3.0 सर्व्हिसमुळे कोणत्याही गोष्टीसाठी लांब रांगा लावणे, ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सबमिट करणे ही सर्व कामे कमी होणार आहे. तुमची सर्व कामे ऑनलाइन झटपट करता येणार आहे. यामुळे ईपीएफओ सदस्यांना बँकिंगसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

EPFO
PF Interest Rate: EPFO सदस्यांना मिळणार सोन्यासारखा परतावा! PF वरील व्याजदर वाढण्याची शक्यता

EPFO 3.0 ची खासियत

EPFO 3.0 ची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता तुम्हाला एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठी कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची घोषणा नाही. याचसोबत इतर अनेत सुविधादेखील मिळणार आहे.

पासबुक

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या मते, ईपीएफओ कोणत्याही अडचणीशिवाय बँक खात्यासारखे काम करणार आहे. सदस्यांना नियोक्त्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कोणत्याही प्रोसेसमधून जायची गरज भासणार नाही. ईपीएफओ सदस्य युनिव्हर्सल अकाउंट नंबर वापरुन थेट पैसे काढू शकतात.

EPFO
PF Account: ईपीएफओने बदलला नियम, आता डॉक्युमेंटशिवाय प्रोफाइल अपडेट होणार, पण...

EPFO 3.0 चा परिणाम

एटीएममधून पैसे काढणे

EPFO 3.0 चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येणार आहे.

डायरेक्ट अॅक्सेस तुम्हाला तुमच्या EPFO खात्याचा डायरेक्ट अॅक्सेस मिळणार आहे. आधार, पॅन कार्ड ही सर्व कागदपत्रांची प्रोसेस डिजिटल करण्यास मदत होईल.

नियोक्त्यांवर अवलंबून राहायची गरज नाही

याआधी पीएफचे पैसे काढण्यासाठी नियोक्त्यांवर अवलंबून राहायची गरज नाही. तुम्ही तुमची कामे स्वतः करु शकतात.

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन

तुम्हाला पेमेंट करण्यासाठी, क्लेमचे पैसे करण्यासाठी किंवा पर्सनल डेटा बदलण्यासाठी कुठेही जायची गरज भासणार नाही. तुम्ही या सर्व गोष्टी ऑनलाइन पद्धतीने करु शकतात.

कार्यक्षमता

EPFO 3.0 मुळे सर्व कामे डिजिटल पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे प्रोसेसिंगसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

EPFO
आता काही सेकंदातच काढता येणार PF चे पैसे, EPFO 3.0 नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com