फैय्याज शेख
भिवंडी : हातचलाखीने एटीएम कार्ड बदली करून नागरिकांची फसवणुक करण्याचे प्रकार भिवंडीमध्ये मागील काही दिवसात समोर आले होते. अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना शांतीनगर पोलीसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्या जवळून वेगवेगळ्या बँकाचे एकुण ३५ एटीएम कार्ड व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
भिवंडी शहरातील बागे फिरदौस येथे अबुशहमा अब्दुल्ला अन्सारी हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी अनोळखी इसमांनी फिर्यादीची नजर चुकवून एटीएम कार्ड हातचलाखीने बदली केला. यानंतर पासवर्ड बघून त्यांच्या बँक खात्यातून १४ हजार रूपये परस्पर काढुन फसवणुक केली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला होता.
दोघांना ताब्यात घेत ३५ एटीएम जप्त
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवुन भिवंडीच्या गैबीनगर येथील अबुलबशर रईस खान, मोहम्मद हाशीम हयातुल्ला शाह या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात त्यांचे जवळ असलेले वेगवेगळ्या बँकांचे एकुण ३५ एटीएम कार्ड व ५ हजार १०० रोख रुपये जप्त केले आहेत.
शांतीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी दोघांची अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.