

क्रेडिट कार्डच्या नियमात बदल
आता ओव्हरलिमिट फीचर बंद
ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार सुरु करता येणार
सध्याच्या काळात लाखो लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड वापरुन तुम्ही खरेदी करु शकतात. दरम्यान, क्रेडिट कार्डवर खर्चाची लिमिट असते. ही लिमिट जर ओलांडली तर तुमच्याकडून दंड वसूल केला जातो. दरम्यान, आता बँकांनी क्रेडिट कार्डधारकांना दिलासा दिला आहे.
जर खर्च क्रेडिट कार्डपेक्षा जास्त झाला तर दंड आकारला जात होता. यामुळे अनेक तक्रारी केल्या होत्या. यामुळेच रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहक खर्च कंट्रोलमध्ये ठेवण्यात आला आहे.
विनामंजुरी ओवरलिमिट सुविधा बंद (Credit Card Over limit Feature Stopped)
नवीन गाइडलाइन्सनुसार, आता बँकांच्या परवानगीशिवाय ग्राहक सहमतीशिवाय ओवरलिमिट फीचर अॅक्टिव्ह करु शकत नाही. याआधी बँक ही सुविधा ऑटोमॅटिक पद्धतीने सुरु करायचे. ज्यामुळे ग्राहक लिमिटपेक्षा जास्त खर्च करायचे. यानंतर आता रिझर्व्ह बँकेने ही सुविधा पूर्णपणे बंद केली आहे.
आता ग्राहक हे फीचर त्यांच्या सुविधेनुसार सक्रिय करु शकणार आहेत. ग्राहकांना अॅप, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल प्लॅटफॉर्म कंट्रोल फीचर असणार आहे. यामुळे ग्राहक कधीही ते हे फीचर सुरु आणि बंद करु शकतात. जे ग्राहक चुकून जास्त खर्च करतात त्यांच्यासाठी हे फीचर अत्यंत उपयोगी आहे.
ओवरलिमिट फीचर सुरु आहे की नाही? असं करा चेक (Credit Card Overlimit Feature)
तुम्हाला कार्ड किंवा मोबाईल अॅपवर जायचे आहे. तिथे कार्ड मॅनेज सेक्शनवर क्लिक करा. यानंतर "Overlimit" किंवा "Limit Control" ऑप्शन दिला असेल. त्यावर क्लिक करुन तुमचे फीचर अॅक्टिव्ह आहे की नाही चेक करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.