GST Rate: व्यसन महागणार! सिगारेट, तंबाखू, कोल्डड्रिंक्सच्या किंमती वाढणार, GST ३५ टक्के होण्याची शक्यता

GST Rate Increases : तंबाखू, सिगरेट अशा वस्तूंवर जीएसटी दर वाढू शकतो. याबाबतचा प्रस्ताव जीएसटी परिषदेकडे देण्यात आला आहे.
GST Rate
GST RateSaam Tv
Published On

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशभरात काही उत्पादनांवरील जीएसटी वाढला जाऊ शकतो. कोल्ड्रिंक्स, सिगारेट, तंबाखू ही उत्पादने महाग होऊ शकतात. GST दर निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्‍यांच्या गटाने हा प्रस्ताव दिला आहे. या उत्पादनावरील कर सध्या २८ टक्के आहे. हा ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. (GST Council News)

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखातील मंत्र्‍यांचा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाने (GoM) कपड्यांवरील कर दर तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री गटाच्या बेठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेणार आहे. एकूण १४८ वस्तूंवरील कर दरांमध्ये बदलांचा प्रस्ताव जीएसटी परिषदेला देण्यात येईल, याचा महसूलावर सकारात्मक परिणाम असेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. (GST Council News)

GST Rate
Success Story: ३ मुलांची आई, लग्नाच्या १८ वर्षानंतर स्पर्धा परीक्षा, तिसऱ्याच प्रयत्नात यश; वाचा प्रेरणादायी प्रवास

या उत्पादनावर 35 टक्के जीएसटी लागू होऊ शकतो

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंत्रिमंडळाने तंबाखू आणि संबंधित उत्पादनावर ३५ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शीत पेयांवर म्हणजेच कोल्ड्रिंक्सवरदेखील ३५ टक्के विशेष दर लावण्याचे मान्य केले आहे. जीएसटीमध्ये ५,१२, १८ आणि २८ टक्के असे चार स्लॅब सुरु राहतील. GoM ने नवीन ३५ टक्के दराचा प्रस्ताव दिला आहे.

याचसोबत GoM ने १,५०० रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर पाच टक्के जीएसटी लावण्यास सांगितले आहे. तर १५,००० ते १०,००० पर्यंतच्या किंमतीच्या कपड्यांवर १८ टक्के जीएसटी आणि १०,००० पेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर २८ टक्के कर लागणार आहे.

GST Rate
EPFO Rule: आता आधार कार्डशिवाय काढा PF चे पैसे; EPFO च्या नियमांत बदल, जाणून घ्या सविस्तर

जीएसटी परिषदेत कोणते निर्णय होणार?

२१ डिसेंबरला जीएसटीच्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या अहवालावर चर्चा होऊ शकते. जीएसटी दरातील बदलाचा निर्णय या बैठकीत होणार आहे. जीएसटीमध्ये चार स्लॅब आहेत. ५,१२, १८ आणि २८ टक्के असे पाच स्लॅब आहेत.यातील काही स्लॅबमध्ये बदल करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो.

GST Rate
PAN 2.0: आता PAN 2.0 येणार थेट तुमच्या ई-मेलवर; फक्त ही प्रोसेस करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com