EPFO Rule: आता आधार कार्डशिवाय काढा PF चे पैसे; EPFO च्या नियमांत बदल, जाणून घ्या सविस्तर

EPFO Rule For PF Withdrawal: दर महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातील काही रक्कम पीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते. आता तुम्ही आधार कार्डशिवाय पीएफ काढू शकणार आहात.
 EPFO Rule
EPFO RuleSaam Tv
Published On

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. आप्कालीन परिस्थितीत आपल्याला पीएफचे पैसे काढण्याची सोय असते. पीएम क्लेम करण्यासाठी आधार कार्डची गरज असते. मात्र, आता तुम्ही आधार कार्डशिवायदेखील पीएफ क्लेम करु शकतात. परंतु यासाठी काही नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. या नवीन नियमामुसार तुम्ही आधार कार्डशिवायदेखील क्लेम अप्रूव होणार आहे त्यानंतर तुम्ही पीएफचे पैसे काढू शकणार आहात. याबाबत ईपीएफओने गाइडलाइन्स जारी केले आहेत. (EPFO Guidelines For PF Withdrawal)

 EPFO Rule
EPFO 3.0: EPFO च्या नियमांत होणार मोठा बदल! आता ATM मधून काढता येणार PF चे पैसे?

या कर्मचाऱ्यांना मिळणार सूट (PF Withdrawal without Aadhaar card)

ईपीएफओच्या नियमानुसार (EPFO Rules) जर तुम्हाला पीएफ सेटल करायचे असेल किंवा पीएफमधून पैसे काढायचे असतील तर तुमचा यूएएन नंबर आणि आधार कार्ड नंबर लिंक असणे गरजेचे आहे. परंतु आता काही कर्माचारी आधार कार्डशिवायदेखील पैसे काढू शकणार आहेत.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार सूट

ज्या कर्मचाऱ्यांनी पीएफसंबंधित सर्व काम केले आहे आणि परदेशात गेले आहेत. त्यांना याअंतर्गत सूट मिळणार आहे. हे कर्मचारी आधार कार्डशिवाय पीएफचे पैसे काढू शकतात.

जे लोक भारत देश सोडून गेले आहेत. परदेशात स्थायिक झाले असून त्यांना त्या देशाचे नागरिकत्व मिळाले आहे, अशा कर्मचाऱ्यांनादेखील आधारशिवाय क्लेम सेटल करता येणार आहे.

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, नेपाल आणि भूटानचे लोक जे भारतीय कंपनीत काम करतात. त्यांना फिजिकल क्लेम हा आधार कार्डशिवाय करता येणार आहे. या कर्मचाऱ्यांकडे नागरिकत्वाचा पुरावा असणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना पूर्ण पैसे मिळणार नाहीत.

 EPFO Rule
आता EPFO सदस्यांना मिळणार भरपूर परतावा; सरकारच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार पैसाच पैसा

EPFO चा निर्णय

केंद्रिय भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या ठेवीवर जास्त परतावा मिळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.CBT ने त्यांच्या ETF मध्ये जमा केलेल्या रुपयांपैकी 50 टक्के रक्कम सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारत 22 फंडमध्ये किमान 5 वर्षांसाठी जमा करण्यास मान्यता दिलीय. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफवर जास्त परतावा मिळू शकतो.

 EPFO Rule
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com