आता EPFO सदस्यांना मिळणार भरपूर परतावा; सरकारच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार पैसाच पैसा

EPFO : सरकारने गेल्या शुक्रवारी पीएफशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. केंद्रीय विश्वस्त मंडळाने कर्मचाऱ्यांची ETF मध्ये केलेली गुंतवणूक आणि उर्वरित रक्कम केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारत 22 फंडामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आलीय.
EPFO New Rule
EPFO New RuleSaam Tv
Published On

नोकदारासाठी एक आनंदाची बातमी आहे. नोकरदारांचे उत्पन्नात वाढ होण्यासाठी सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या ठेवींवर जास्त परतावा मिळणार आहे. गेल्या शुक्रवारी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीत EPFO ​​आणि EPF शी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. त्याच बैठकीत सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना चांगला परतावा देण्यासाठी एक्सचेंज ट्रेडेड फंडामध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता दिलीय.

EPFO New Rule
Pension: सेवानिवृत्तीच्या आधी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते का? वाचा नियम काय सांगतो

अहवालानुसार कर्मचाऱ्यांना अधिक लाभ देण्यासाठी, CBT ने त्यांच्या ETF मध्ये जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारत 22 फंडमध्ये किमान 5 वर्षांसाठी जमा करण्यास मान्यता दिलीय. याशिवाय, उर्वरित रक्कम सरकारी रोखे आणि कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवली जाईल, ज्यातून कर्मचाऱ्यांना पीएफवर उच्च परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

EPFO New Rule
Pension: सेवानिवृत्तीच्या आधी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते का? वाचा नियम काय सांगतो

EPFO ऍम्नेस्टी स्कीम 2024 ची शिफारस केली

बैठकीत CBT ने ऍम्नेस्टी स्कीम 2024 ची शिफारस केली होती. याशिवाय कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांच्याकडून येणाऱ्या तक्रारी कमी करणे. यासाठी बोर्डाने ईपीएफ स्कीम 1952 मध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ज्या अंतर्गत आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेपर्यंत दावे निकाली काढले जात होते. त्यावर गेल्या महिनाअखेरपर्यंतच व्याज दिले जात होते, मात्र मंडळाने हा नियम बदलला आहे. आता दावा निकाली निघेपर्यंत व्याज दिले जाणार आहे.

EPFO New Rule
PAN 2.0: आता PAN 2.0 येणार थेट तुमच्या ई-मेलवर; फक्त ही प्रोसेस करा फॉलो

सरकारने पीएफ कर्मचाऱ्यांच्या बाजूने आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत ऑटो क्लेम मर्यादा आता 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आलीय. आता लग्नासाठी आणि घर बांधण्यासाठी आगाऊ पैसे घेता येतील. याशिवाय EDLI बाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचे फायदे 28 एप्रिल 2024 पूर्वी लागू करण्यास मान्यता देण्यात आलीय. या अंतर्गत विम्याचा किमान लाभ 2.5 लाख रुपये आणि कमाल 7 लाख रुपये असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com