34km मायलेज, किंमत 5.96 लाख रुपये; 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त CNG कार्स, पाहा लिस्ट

Cheapest CNG Cars: तुम्ही जर बेस्ट सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
34km मायलेज, किंमत 5.96 लाख रुपये; 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त CNG कार्स, पाहा लिस्ट
Cheapest CNG CarsSaam Tv
Published On

जर तुम्ही देखील धनत्रयोदशीच्या दिवशी स्वस्त कमी बजेटची सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज तुम्हाला अशा तीन स्वस्त सीएनजी कारची माहिती सांगणार ​​आहोत, ज्या तुमच्या बजेटमध्ये आणि दैनंदिन वापराच्या अनुषंगानेही बेस्ट पर्याय ठरू शकतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी कारच्या किमती थोड्या जास्त असल्या तरी मायलेजच्या बाबतीत या गाड्या सगळ्यांना मागे टाकतात.

Maruti Suzuki Alto K10 CNG

मारुती सुझुकी अल्टो K10 CNG कार सर्वात किफायतशीर कार आहे. याच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे कार चालवायला मजा येते आणि ट्रॅफिकमध्येही गाडी सहज नेव्हिगेट करू शकते. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे. यात सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. ही कार सीएनजी मोडमध्ये 33.85 km/kg मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे.

34km मायलेज, किंमत 5.96 लाख रुपये; 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त CNG कार्स, पाहा लिस्ट
मुंबई - नाशिक - मुंबई एका चार्जमध्ये गाठणार; Creta EV सह Hyundai लॉन्च करणार 4 जबरदस्त कार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सेफ्टीसाठी कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्ज आहेत. याची एक्स-शो रूम किंमत 5.96 लाख रुपयांपासून सुरू होते. अल्टो ही लहान कुटुंबासाठी बेस्ट कार आहे. यातील बूट स्पेस चांगला आहे आणि 4 लोक आरामात बसू शकतात. मात्र कंपनीचा दावा आहे की त्यात 5 लोक बसू शकतात.

Maruti Suzuki Celerio CNG

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या कारमध्ये जागेची कमतरता नाही. Celerio CNG ही प्रीमियम हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मोडवर 34.43 km/kg मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. या कारमध्ये सुरक्षेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह EBD आणि एअरबॅग्जची सुविधा आहे. Celerio CNG ची एक्स-शो रूम किंमत 6.73 लाख रुपयांपासून सुरू होते.

34km मायलेज, किंमत 5.96 लाख रुपये; 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त CNG कार्स, पाहा लिस्ट
Fortuner पेक्षाही स्वस्त असेल टेस्लाची Robotaxi, फीचर्स जाणून थक्क व्हाल; ड्रायव्हरलेस कारची किंमत किती?

Maruti S-Presso CNG

मारुती सुझुकी एस-प्रेसो ही जबरदस्त कार आहे, जिला मायक्रो एसयूव्ही म्हणून देखील ओळखतात. यात ALto K10 इतकी जागा देखील मिळते. S-Presso CNG ची किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये चांगली स्पेस मिळते. मात्र यात फक्त 4 लोक व्यवस्थित बसू शकतात. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 32.73km/kg च्या मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com