मुंबई - नाशिक - मुंबई एका चार्जमध्ये गाठणार; Creta EV सह Hyundai लॉन्च करणार 4 जबरदस्त कार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Hyundai Creta EV: Hyundai लवकरच आपली जबरदस्त इलेक्ट्रिक कार Creta लॉन्च करणार आहे. यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
मुंबई - नाशिक - मुंबई एका चार्जमध्ये गाठणार; Creta EV सह Hyundai लॉन्च करणार 4 जबरदस्त कार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Hyundai Creta EV: Saam Tv
Published On

Hyundai Motor India पुढील वर्षी आपली Creta EV भारतात लॉन्च करणार आहे. Creta EV नंतर कंपनी आणखी 3 नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. मात्र भारतात कोणते इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले जातील हे अद्याप समोर आलेलं नाही.

कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कार मिड-रेंज सेगमेंट ते प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च करणार आहे. सध्या Ionic-5 इलेक्ट्रिक कार बाजारात आहे, तर Kona EV अलीकडेच बंद करण्यात आली आहे.

मुंबई - नाशिक - मुंबई एका चार्जमध्ये गाठणार; Creta EV सह Hyundai लॉन्च करणार 4 जबरदस्त कार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Fortuner पेक्षाही स्वस्त असेल टेस्लाची Robotaxi, फीचर्स जाणून थक्क व्हाल; ड्रायव्हरलेस कारची किंमत किती?

बॅटरी आणि रेंज

Hyundai Creta Electric ला 45kWh चा बॅटरी पॅक मिळू शकतो. जो एका चार्जवर 450 किलोमीटर पर्यंतची रेंज देईल. याशिवाय, इलेक्ट्रिक क्रेटाची मोटर 138hp पॉवर आणि 255 Nm टॉर्क जनरेट करते.

किती असेल किंमत?

रेंजच्या दृष्टीने इलेक्ट्रिक क्रेटा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.  Creta EV ची किंमत 20 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. Hyundai Creta EV चे डिझाईन ICE मॉडेलसारखे असेल, ज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हर्जनच्या स्वरूपात काही बदल दिसून येतील.

मुंबई - नाशिक - मुंबई एका चार्जमध्ये गाठणार; Creta EV सह Hyundai लॉन्च करणार 4 जबरदस्त कार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bajaj ची ही स्टायलिश बाईक देते 49 किमीचा जबरदस्त मायलेज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर्स

नवीन Creta EV मध्ये सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. यामध्ये 6 एअरबॅग्ज, एबीएससह EBD, 360 डिग्री कॅमेरा, लेव्हल 2 ADAS डॅशकॅम, क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग पॅड, टाईप सी चार्जिंग पोर्ट, असे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. क्रेटा ईव्हीची लांबी 4330 मिमी, रुंदी 1790 मिमी, उंची 1635 मिमी आहे. wheelbase 2610mm आणि त्याला 433mm बूट स्पेस मिळेल.

याशिवाय 17 इंचाचे टायरही यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. क्रेटा इलेक्ट्रिक पुढील वर्षी ऑटो एक्सपो 2025 मध्ये सादर केली जाऊ शकते. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने पुढील दहा वर्षांसाठी 32,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com