
महिन्याचा खर्च भागवताना सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामी होतो. त्यामुळे अनेकदा खर्च भागवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करतात. शॉपिंगला गेल्यावर किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल तर क्रेडिट कार्डचा वापर करतात. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतात जवळपास १०.९८ कोटी लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. या क्रेडिट कार्डने तुम्ही घरभाडे भरु शकतात का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.तर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारेही घरभाडे भरु शकतात.
जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे भरले तर कॅशबॅक आणि रिवार्ड पॉइंट्स तुम्हाला मिळतील. याचसोबत तुम्हाला पैशांसंबंधितदेखील अनेक फायदे होते.
क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे भरण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म निवडणे खूप गरजेचे आहे. क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी CRED, PayZapp अशा अॅपचा तुम्ही वापर करु शकतात.
क्रेडिट कार्डद्वारे कसं भरायचं घरभाडं? (Credit Card Payment)
तुम्ही ज्या अॅपचा वापर करता त्यावर जाऊन साइन अप करायचे आहे. यानंतर संपूर्ण केवायसी प्रक्रिया पर्ण करायची आहे. यानंतर घरमालकाला Beneficiary म्हणून जोडावे. यानंतर बँक खाते क्रमांक, IFSC कोड ही माहिती भरायची आहे. यानंतर तुमच्या भाड्याची रक्कम टाका. त्यानंतर सबमिट करा. यानंतर तुमच्या घरमालकाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतील.
या गोष्टींची काळजी घ्या
प्रोसेसिंग फी
क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे भरताना अॅप तुमच्याकडून प्रोसेसिंग फी घेते. ०.९ ते २.५ टक्के प्रोसेसिंग फी आणि त्यावर जीएसटीदेखील आकारते. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या.
व्याज
क्रेडिट कार्डचे व्याज मुक्त अवधी हा ४५-५० दिवसांचा असतो. त्यामुळे या काळात तुम्हाला कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.
क्रेडिट स्कोर
जर तुम्ही वेळच्या वेळी पैसे भरले तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.