Ola नंतर आता 'या' कंपनीने Electric Scooter च्या किंमतीत केली मोठी कपात; ग्राहकांना होणार मोठा फायदा

Bounce Infinity E1+ E-Scooter Price Drops: अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री वाढवण्यासाठी भरघोस सूट देत आहेत. या यादीत एकामागून एक नवीन नावे जोडली जात आहेत.
Bounce Infinity E1+ E-Scooter Price Drops
Bounce Infinity E1+ E-Scooter Price DropsSaam Tv
Published On

Bounce Infinity E1+ E-Scooter Price Drops:

अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री वाढवण्यासाठी भरघोस सूट देत आहेत. या यादीत एकामागून एक नवीन नावे जोडली जात आहेत. याआधी ओलाने व्हॅलेंटाइन डे ऑफर सुरू केली होती. तर iVooMe ने देखील आपल्या ई-वाहनावर 31 मार्चपर्यंत ऑफर आणली आहे.

यातच आता बेंगळुरू येथील ईव्ही (EV) उत्पादक कंपनी बाऊन्स इन्फिनिटीही आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी सूट जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 24,000 रुपयांनी कमी केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bounce Infinity E1+ E-Scooter Price Drops
Bike Sales Report: स्प्लेंडर, शाईन, पल्सरला सोडलं मागे; Hero च्या 'या' बाईकची तब्बल 734 टक्क्यांनी वाढली मागणी

या कपातीनंतर इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन एक्स-शोरूम किंमत 113,000 रुपयांवरून 89,999 रुपयांवर आली आहे. याच्या नवीन किमतीही तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. इन्फिनिटी E1+ इलेक्ट्रिक स्कूटरवरील ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत वैध असेल. (Latest Marathi News)

Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटरला 2.2kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते. जी 65 kmph चा टॉप स्पीड देते. स्कूटर 2kWh लिथियम-आयन NMC बॅटरी पॅकसह येते. जी एका चार्जवर 85 किमी पेक्षा जास्त IDC रेंज देते. E1+ इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन स्प्रिंग शॉक देण्यात आले आहेत.

Bounce Infinity E1+ E-Scooter Price Drops
Hanooman AI Chatbot: मुकेश अंबानी लवकरच BharatGPT चा चॅटबॉट करणार लॉन्च, ChatGPT शी करणार स्पर्धा

देशभरात आहे 70 पेक्षा जास्त डीलरशिप

दरम्यान, कंपनीचे देशभरात 70 पेक्षा जास्त डीलरशिप आहेत. यातच कंपनीने आपल्या स्कूटरची किंमत कमी केल्याने ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत आहे. याचबद्दल बोलताना बाउंस इन्फिनिटीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि सह-संस्थापक अनिल म्हणाले की, ही महत्त्वपूर्ण किंमत कपात आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे समर्पण दर्शवते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com