देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पुढील महिन्यात ChatGPT सारखा भारतीय AI चॅटबॉट लॉन्च करण्याचा विचार करत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, देशातील आठ प्रमुख अभियांत्रिकी शाळांच्या सहकार्याने, लार्ज लँग्वेज मॉडेलवर (LLM) आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोजेक्ट BharatGPT वर काम करत आहे.
BharatGPT ची पहिली झलक मुंबईत झालेल्या तंत्रज्ञान परिषदेत दाखवण्यात आली. यात एक व्हिडिओ दाखवण्यात आला, ज्यामध्ये दक्षिण भारतातील एक मोटरसायकल मेकॅनिक त्याच्या मातृभाषेत एआय बॉटला प्रश्न विचारताना दिसत आहे. हे या वर्षी मार्च महिन्यात लॉन्च होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या AI-मॉडेलचे नाव हनुमान असू शकते. हे नाव एआय तंत्रज्ञानातील भारताच्या वेगवान गतीला प्रतिबिंबित करेल अशी शक्यता आहे. BharatGPT 11 स्थानिक भाषांमध्ये काम करेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे आरोग्य, प्रशासन, वित्त आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देईल. हे रिलायन्स जिओ इन्फोकॉम, आयआयटी बॉम्बे आणि अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आणि भारत सरकार यांनी संयुक्तपणे तयार केले आहे.
दरम्यान, भारतात अनेक लोक ओपन-सोर्स एआय मॉडेल्सवर काम करत आहे. यामध्ये अनेक नवीन स्टार्टअप्स आहेत. ज्याला अनेक गुंतवणूकदार आणि अब्जाधीशांचे समर्थन मिळत आहे. Sarvam आणि Krutrim हे त्यापैकी प्रमुख आहेत. या भारतीय कंपन्या त्यांच्या मॉडेलद्वारे सिलिकॉन व्हॅलीमधून काम करणाऱ्या OpenAI ला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, रिलायन्स जिओने आधीच स्पष्ट केले आहे की, ते अनेक विशेष प्रोजेक्टसाठी लार्ज लँग्वेज मॉडेलवर काम करत आहे. यासोबतच कंपनी आधीच जिओ ब्रेनवर काम करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.