मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय MPV पैकी एक आहे. याशिवाय कंपनीच्या सर्वाधिक विक्रीच्या यादीतही त्याचा समावेश आहे. ही कार सर्वाधिक फॅमिली राइड्स आणि फ्लाइटसाठी खूप वापरली जाते.
आता मारुती सुझुकीने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेलचा क्रूझ हायब्रिड व्हर्जन लॉन्च केला आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या IIMS 2024 मध्ये Ertiga चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हे नवीन मॉडेल इंडोनेशियामध्ये Suzuki Ertiga Cruise Hybrid म्हणून ओळखले जाईल, असं सांगण्यात येत आहे. या कारच्या बाहेरील भागात बरेच बदल करण्यात आले आहेत. ही कार माईल्ड हायब्रिड पॉवरट्रेन सिस्टमसह सादर करण्यात आली आहे. कंपनीने Ertiga Cruise Hybrid मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारांमध्ये ऑफर केली आहे. भारतीय चलनात या MPV ची किंमत जवळपास 15.3 लाख रुपये आहे. (Latest Marathi News)
नवीन Suzuki Ertiga Cruise मध्ये K15B स्मार्ट हायब्रिड पॉवरट्रेन आहे. त्याच्यासोबत 10ah बॅटरी उपलब्ध आहे. नवीन Ertiga Cruze मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 104bhp ची पॉवर आणि 138Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हेच इंजिन भारतात विकल्या जाणाऱ्या Ciaz Hybrid मध्ये देखील उपलब्ध आहे. सुझुकी एर्टिगा क्रूझ हायब्रिड एमपीव्ही दोन रंग पर्यायांमध्ये (कूल ब्लॅक ड्युअल टोन आणि कूल ब्लॅक विथ पर्ल व्हाइट) सादर करण्यात आली आहे.
लूकबद्दल बोलायचे झाले तर Ertiga चे नवीन हायब्रिड मॉडेल खूपच स्पोर्टी दिसते. अपडेटेड Ertiga स्पोर्टी फ्रंट बंपर, साइड अंडर स्पॉयलर, साइड बॉडी डेकल, रिअर अप्पर स्पॉयलर, स्पोर्टी रियर बंपर अंडर स्पॉयलरसह येते.
सुझुकी एर्टिगा क्रूझ हायब्रिडच्या मॅन्युअल व्हॅरिएंट किंमत IDR 288 मिलियन म्हणजेच 15.3 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर Ertiga Cruise च्या ऑटोमॅटिक व्हॅरिएंट किंमत IDR 301 मिलियन म्हणजेच सुमारे 16 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. दरम्यान, भारतात उपलब्ध असलेल्या मारुती एर्टिगाची एक्स-शोरूम किंमत 8.69 लाख ते 13.3 लाख रुपयांपर्यंत आहे. Ertiga मध्ये माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.5-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 103 PS पॉवर आणि 136.8 Nm टॉर्क जनरेट करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.