गेल्या काही वर्षांत भारतीय कार खरेदी करणारे ग्राहक कौटुंबिक सुरक्षेबाबत खूप जागरूक झाले आहेत. बऱ्याच कंपन्या त्यांच्या बहुतेक मॉडेल्समध्ये सुरक्षिततेची सतत काळजी घेतात. या यादीत टाटा मोटर्सचे नाव सर्वात आधी घेतलं जातं. टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही नेक्सॉन, टाटा पंच, टाटा सफारी आणि टाटा हॅरियर सारख्या कारमध्ये कंपनीने सुरक्षिततेची अत्यंत काळजी घेतली आहे.
यासाठी ग्लोबल NCAP ने क्रॅश टेस्टमध्ये या गाड्यांना 5-स्टार रेटिंग देखील दिली आहे. यातच काही दिवसांपूर्वी Tata Nexon ही ग्लोबल NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळवणारी नवीन SUV बनली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Tata Nexon ला प्रौढ सुरक्षेसाठी ग्लोबल NCAP टेस्टमध्ये 34 पैकी 32.22 गुण मिळाले आहेत. तर या SUV ला मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 44.52 गुण मिळाले आहेत. दरम्यान, 2018 मध्ये Tata Nexon ही भारतातील पहिली कार बनली होती, जिने ग्लोबल NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळवली आणि सुरक्षिततेचा बेंचमार्क बनली. (Latest Marathi News)
सुरक्षिततेच्या बाबतीत उच्च दर्जा राखल्याने या एसयूव्हीची विक्री वाढण्यासही मदत झाली आहे. दुसरीकडे ग्लोबल एनसीएपीने टाटा सफारीला प्रौढांच्या सुरक्षेसाठी 34 पैकी 33.05 गुण आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 गुण दिले आहेत.
यातच Tata Harrier ला देखील Tata Safari सारखेच सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. तर अलीकडेच टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV पंच आणि Tata Altroz ला देखील ग्लोबल NCAP ने 5 स्टार रेटिंग दिली आहे. ग्लोबल NCAP ने प्रौढांच्या सुरक्षेसाठी टाटा पंचला 17 पैकी 16.45 गुण आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 40.89 गुण दिले आहेत. तर Tata Altroz प्रीमियम हॅचबॅकला प्रौढांच्या सुरक्षेसाठी 17 पैकी 16.13 गुण आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 29 गुण मिळाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.