जानेवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकची यादी समोर आली आहे. ही यादी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. दरवर्षीप्रमाणे याही यादीत हिरो स्प्लेंडर, होंडा शाइन, बजाज पल्सर या मॉडेल्सची सर्वाधिक विक्री झाली आहे. स्प्लेंडरच्या 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली, तर शाईन आणि पल्सरच्या प्रत्येकी 1 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली.
या पॉवरफुल मॉडेल्समध्ये, एक बाईक होती जी टॉप-10 यादीत आठव्या स्थानावर राहिली. मात्र वार्षिक वाढीच्या बाबतीत, तिने सर्वांना मागे सोडले आहे. या बाईकचे नाव आहे 'हिरो पॅशन'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पॅशनने जानेवारीमध्ये 30,042 युनिट्सची विक्री केली. जानेवारी 2023 मध्ये ही संख्या फक्त 3,601 युनिट्स होती. म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीत आणखी 26,441 युनिट्सची विक्री झाली. यातच वार्षिक 734.27 टक्केवाढ झाली. टॉप-10 यादीत पॅशन ही एकमेव बाईक होती जिला वर्षभरात इतकी जबरदस्त वाढ मिळाली. इतर मॉडेल्सची 65 टक्केही वार्षिक वाढ झाली नाही. नंबर-1 हिरो स्प्लेंडरने वार्षिक 2.56 टक्के झाली आहे. (Latest Marathi News)
गेल्या महिन्यात टॉप-10 बाईकमध्ये स्थान मिळालेल्या मॉडेल्समध्ये Hero Splendor, Honda Shine, Bajaj Pulsar, Hero HF Deluxe, TVS Raider, Bajaj Platina, TVS Apache, Hero Passion, Royal Enfield Classic 350 आणि Honda Unicorn यांचा समावेश आहे. ही सर्व ICE मॉडेल्स आहेत. एकाही इलेक्ट्रिक बाईकचा टॉप-10 मध्ये समावेश नाही.
Passion Xtec मध्ये LED हेडलाइट आणि पूर्णपणे डिजिटल कन्सोल आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही ग्राहकांना मिळते. ज्यामुळे तुम्हाला कॉल आणि एसएमएस अलर्ट मिळत राहतील. यात USB चार्जिंग पोर्ट आणि साइड-स्टँड कट-ऑफ सेन्सर देखील मिळतो.
Passion Plus बद्दल बोलायचे झाले तर, यात 97.2cc चे इंजिन आहे. जे 7.91 bhp ची पॉवर आणि 8.05 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याव्यतिरिक्त पॅशन प्लस सेमी-डिजिटल क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, साइड-स्टँड कट-ऑफ फंक्शन आणि हिरोच्या स्टँडर्ड i3S तंत्रज्ञानासह येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.