LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

LPG Gas Cylinder: एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात मोठा बदल होणार आहे.
LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर
LPG Gas Cylindersaam tv
Published On
  • १ जुलैपासून एलपीजी नियमांमध्ये मोठे बदल होणार

  • पीएनजी आणि एलपीजी दोन्ही वापरणाऱ्या ग्राहकांना फटका बसू शकतो

  • ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक

  • नियमांचे पालन न केल्यास गॅस कनेक्शन कट होणार

एलपीजी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. १ जुलैपासून एलपीजी सिलिंडरसंबंधीत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांचे गॅस कनेक्शन कट होऊ शकते. ज्यांच्याकडे सध्या पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन आहेत अशा ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. ज्या ग्राहकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनाही १ जुलैपासून एलपीजी सिलिंडर मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागेल.

केंद्र सरकारने मागच्या महिन्यामध्ये एलपीजी पुरवठा आणि वितरण नियमन सुधारणा आदेश २०२६ ची अंमलबजावणी अनिवार्य केली. या नियमानुसार, ज्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन आहे त्यांचे इंडेन, एचपी आणि भारत गॅस कनेक्शन ३० दिवसांच्या आत कट केले जातील. जर ग्राहकाने स्वतःहून त्याचे एलपीजी कनेक्शन रद्द केले तर त्याला एक कूपन दिले जाईल ज्यामुळे त्याला भविष्यात गरज भासल्यास एलपीजी कनेक्शन मिळवता येईल.

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर
July 1 Rule Change : १ जुलैपासून देशात 5 मोठे बदल; LPG, ATM ते HDFC कार्डधारकांवर होणार थेट परिणाम

मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने जारी केले होते की, ज्या ठिकाणी पीएनजीची सुविधा आहेत त्याठिकाणच्या एलपीजी ग्राहकांनी ३ महिन्यांच्या आत पीएनजी कनेक्शन घेणे अनिर्वाय आहे असे जर त्यांनी केले नाही तर त्यांचे एलपीजी कनेक्शन कट केले जाईल. त्यामुळे जर तुमच्या परिसरात जर पीएनजी कनेक्शन असेल तर या सुविधेचा लवकरात लवकर लाभ घ्या. मार्चमध्ये निश्चित केलेली ३ महिन्यांची मुदत जून २०२६ मध्ये संपत आहे.

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर
LPG Rule Change: LPG च्या नियमात मोठा बदल, ३० दिवसांच्या आत सिलिंडर परत करावा लागणार नाही तर...

दुसरं महत्वाचे म्हणजे, सरकारने सर्व एलपीजी कनेक्शन धारकांसाठी ई-केवायसी अनिर्वाय केले आहे. सर्व एलपीजी कनेक्शन धारकांनी ३० जून २०२६ पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. असे न केल्यास त्यांचे गॅस कनेक्शन कट केले जाऊ शकते. त्यामुळे बुकिंगमध्ये देखील अडचणी येऊ शकतात. तर ज्यांनी आधीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अनिर्वाय नाही.

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर
LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com