

३० जूननंतर एलपीजी कनेक्शन बंद होणार
पीएनजी सुविधा असलेल्या काही ग्राहकांना फटका बसणार
उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी e-KYC आवश्यक आहे
e-KYC न केल्यास सबसिडीवर परिणाम होऊ शकतो
एलपीजी गॅस सिलिंडरबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. देशामध्ये सध्या सगळीकडे ३० जूननंतर एलपीजी सिलिंडर मिळणार नाहीत, अशी जोरदार चर्चा होत आहे. पण सत्य परिस्थिती काहीशी वेगळी आहे. सरकारने गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर पूर्णपणे बंदी घातलेली नाही तर उलट काही नवीन नियम आणि अंतिम मुदती निश्चित केल्या आहेत. ज्याचा परिणाम काही ग्राहकांवर होऊ शकतो. त्या नेमक्या काय आहेत आणि कोणत्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत...
एलपीजी सिस्टम अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी केंद्र सरकार अनेक नियमांमध्ये बदल करत आहे. या बदलांचा मुख्य उद्देश म्हणजे ड्युप्लीकेट कनेक्शाला प्रतिबंध घालणे, अनुदान योग्य लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे आणि पीएनजी उपलब्ध आहे तिथे एलपीजीवरील अवलंबित्व कमी करणे हे आहे.
मार्च महिन्यात सरकारने एक नवीन नियम लागू केला होता. या नियमानुसार ज्या भागांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा होतो म्हणजे पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे तेथील रहिवाशांना ९० दिवसांच्या आत एलपीजीवरून पीएनजीवर स्विच करणे आवश्यक आहे. ही अंतिम मुदत ३० जून आहे आणि आता यासाठी अवघे २ दिवस शिल्लक राहिले आहेत.
पीएनजी सुविधा असूनही जर एखादा ग्राहक एलपीजी सिलेंडरचा वापर सुरू ठेवत असेल तर त्याचे गॅस कनेक्शन कट केले जाऊ शकते किंवा एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. नाही तर त्याचं गॅस कनेक्शन कट केले जाईल.
- ज्या भागांमध्ये पीएनजी उपलब्ध आहे.
- ज्यांनी अद्याप पीएनजी कनेक्शन खरेदी केलेले नाही.
- जे एलपीजी आणि पीएनजी दोन्ही एकत्र वापरत आहेत.
केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच गॅस कनेक्शन वैध असेल आणि पीएनजी असताना एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर करणे हे नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे अशा ग्राहकांनी वेळीच हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, एलपीजी ग्राहकांना विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास गॅस सिलेंडर अनुदान गमवावे लागू शकते. मात्र सिलेंडरची उपलब्धता थांबवली जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.