

1,000 रुपयांपर्यंतच्या उत्पादनांवर झिरो रेफरल फी लागू करण्याचा निर्णय ई-कॉमर्स क्षेत्रात मोठा बदल घडवणारा ठरणार आहे. विशेषतः लहान व्यवसायांसाठी हा खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. 16 मार्चपासून Amazon India ने 12.5 कोटी उत्पादनांवर आणि 1,800 हून जास्त कॅटेगरीमध्ये हा बदल लागू जाईल. याचसोबतच 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या उत्पादनांसाठी Easy Ship शुल्कात 20 टक्क्यांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. या दोन्ही निर्णयांचा एकत्रित परिणाम म्हणजे विक्रेत्यांच्या एकूण selling fees मध्ये तब्बल 70 टक्क्यांपर्यंत बचत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑनलाइन व्यवसाय करताना सर्वात मोठे आव्हान म्हणजे वाढणारा खर्च. रेफरल फी, लॉजिस्टिक्स आणि शिपिंग यामुळे उत्पादनांची अंतिम किंमत वाढते आणि विक्रेत्यांचा नफा कमी होतो. पण आता 1,000 रुपयांपर्यंतच्या उत्पादनांवर रेफरल फी पूर्णपणे माफ केल्यामुळे विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा थेट परिणाम म्हणजे ते ग्राहकांना जास्त स्पर्धात्मक दरात उत्पादनं देऊ शकतात. विशेषतः कपडे, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीज, खेळणी आणि किचनवेअर यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये ग्राहकांना जास्त पर्याय आणि स्वस्त दर मिळू शकतात.
तसेच या निर्णयामुळे लहान व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करण्यासाठीही प्रोत्साहन मिळणार आहे. पूर्वी जास्त शुल्कांमुळे अनेक विक्रेते मर्यादित उत्पादनांवरच लक्ष केंद्रित करत होते. आता कमी खर्चामुळे ते अधिक विविध उत्पादने सूचीबद्ध करू शकतात. टी-शर्ट्स आणि इअरफोन्सपासून साड्या, बेडशीट्स, खेळणी आणि किचन उपकरणांपर्यंत विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करणे जास्त सोपं होणार आहे. यामुळे व्यवसायाचा विस्तार वेगाने होऊ शकेल.
प्रत्येक विक्रीतून होणारी कमाई वाढणे हा या निर्णयाचा आणखी एक मोठा फायदा आहे. लहान विक्रेत्यांसाठी प्रत्येक युनिट महत्त्वाचा असतो. कमी शुल्कांमुळे प्रत्येक उत्पादनावरची बचत वाढते आणि ती मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यास एकूण नफ्यात लक्षणीय वाढ होते. उदाहरणार्थ, ₹798 किंमतीचे इअरफोन्स Amazon द्वारे विकल्यास प्रति युनिट ₹139 इतकी बचत होऊ शकते, म्हणजेच शुल्कांमध्ये सुमारे 56 टक्के कपात. मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ही बचत त्यांच्या मासिक उत्पन्नात मोठा फरक करू शकते.
कमी किंमती आणि स्पर्धात्मक दरांमुळे उत्पादनांची विक्री वेगाने होण्याची शक्यता वाढते. यामुळे inventory जलद फिरते आणि न विकलेल्या स्टॉकमध्ये अडकलेले भांडवल कमी होते. याशिवाय, एका पॅकेजमध्ये अनेक उत्पादने पाठवण्यावर मिळणाऱ्या सवलतीमुळे विक्रेत्यांना जास्त बचत करता येते. दुसऱ्या युनिटपासून selling fees मध्ये 90 टक्क्यांपर्यंत बचत होण्याची शक्यता असल्यामुळे bulk selling ला प्रोत्साहन मिळते.
देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी वाढणे हा ई-कॉमर्सचा सर्वात मोठा फायदा मानला जातो. Easy Ship सारख्या सुविधांमुळे विक्रेते त्यांच्या ठिकाणाहूनच संपूर्ण भारतात उत्पादने विकू शकतात. Amazon कडून pickup आणि delivery व्यवस्थापित केली जात असल्यामुळे लॉजिस्टिक्सची चिंता कमी होते. ₹300 पेक्षा कमी किंमतीच्या उत्पादनांसाठी शिपिंग शुल्कात झालेली कपात विशेषतः टियर-2 आणि टियर-3 शहरांतील विक्रेत्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, कारण त्यांना आता कमी खर्चात देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल.
नवीन उद्योजकांसाठीही हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे. ऑनलाइन व्यवसाय सुरू करताना सुरुवातीचा खर्च हा मोठा अडथळा असतो. मात्र, झिरो रेफरल फीमुळे listing cost मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे कारागीर, लघुउद्योग आणि homegrown brands यांना ऑनलाइन बाजारपेठेत प्रवेश करणे अधिक सोपे होणार आहे. कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाल्यामुळे अधिक लोक ई-कॉमर्सकडे वळण्याची शक्यता आहे.
या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बचत झालेला पैसा पुन्हा व्यवसायात गुंतवण्याची संधी. विक्रेते ही बचत packaging सुधारण्यासाठी, जाहिरातींसाठी, नवीन उत्पादने लॉन्च करण्यासाठी किंवा inventory वाढवण्यासाठी वापरू शकतात. यामुळे व्यवसाय अधिक मजबूत आणि स्पर्धात्मक बनतो. मागील काही काळात शुल्कांमध्ये झालेल्या कपातीमुळे विक्रेत्यांनी त्यांच्या व्यवसायात अधिक आत्मविश्वासाने गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे. आता हा फायदा अधिक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे ही वाढ आणखी वेगाने होण्याची शक्यता आहे.
एकूणच, ₹1,000 पर्यंतच्या उत्पादनांवरील झिरो रेफरल फी हा निर्णय केवळ खर्च कमी करणारा नसून, लहान व्यवसायांच्या वाढीसाठी नवी दिशा देणारा ठरत आहे. कमी खर्च, वाढलेला नफा, अधिक ग्राहकांपर्यंत पोहोच आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी यामुळे हा बदल ई-कॉमर्स क्षेत्रात दीर्घकालीन प्रभाव टाकू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.