Investment Tips : FDमध्ये गुंतवणूक करायची आहे? कोणती बँक देतेय सर्वाधिक व्याज? जाणून घ्या

Investment Tips in marathi : फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. भारतातील काही बँका सर्वाधिक व्याज देतात.
 investment tips
fd investment Saam tv
Published On

Fixed Deposit Interest Rate: आता बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. तुम्ही चांगला पर्याय निवडल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्यासाठी फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय मानला जातो. भारतातील विविध बँकेत १ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया

ग्राहकांना १ वर्षासाठी ७.३० टक्के, ३ वर्षांसाठी ७.२५ टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५० व्याज देते. तुम्ही २० लाखांची गुंतवणूक केल्यास एक वर्षांनी तुम्हाला २१,५०,०४६ रुपये, ३ वर्षांनी २४,८१,०९४ रुपये आणि ५ वर्षांनी २८,९९,८९६ रुपये मिळतील.

 investment tips
SBI Bank: 3 वर्षात पैसा होणार डबल! SBI च्या मालामाल करणाऱ्या 'या' ५ स्कीम कोणत्या?

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा ही बँक १ वर्षाला ७.३५ टक्के, ३ वर्षाला ७.६५ टक्के आणि ५ वर्षाला ७.४० व्याज देते. तुम्ही बँकेत २० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास १ वर्षांनी तुम्हाला २१,५१,१०२ रुपये, ३ वर्षांनी २५,१०,४९६ रुपये आणि ५ वर्षांनी २८,८५,६९७ रुपये मिळतील.

पंजाब नॅशनल बँक

पीएनबी बँकेत एफडीत गुंतवणूक केल्यास १ वर्षाला ७.३० टक्के, ३ वर्षाला ७.६५ टक्के आणि ५ वर्षाला ७.४० टक्के देते. तुम्ही बँकेत २० लाख रुपयांची गुंतवणूक १ वर्षांसाठी केल्यास २१,५०,०४६ रपये, ३ वर्षांसाठी २५,१०,४९६ रुपये, ५ वर्षांसाठी २८,२९,५५६ रुपये रिटर्न मिळतील.

 investment tips
Bank Holidays: मार्च महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

कॅनरा बँक

ग्राहकांनी १ वर्षासाठी गुंतवणूक केल्यास ७.३५ टक्के, ३ वर्षांसाठी ७.९० टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.२० टक्के व्याज मिळेल. जर बँकेत २० लाखांची गुंतवणूक १ वर्षांसाठी केल्यास २१,५१,१०२ रुपये, ३ वर्षांसाठी २५,२९,०३३ रुपये आणि ५ वर्षांठी २८,५७,४९६ रुपये मिळतील.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआयसी बँक ग्राहकांना १ वर्षासाठी ७.२० टक्के, ७.५० टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५० टक्के व्याज देते. २० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास १ वर्षात २१,४७,९३५ रुपये, ३ वर्षांसाठी २४,९९,४३३ रुपये रिटर्न, ५ वर्षांसाठी २८,९९,८९६ रुपये रिटर्न मिळतील.

 investment tips
Bank Error : बँकेची एक चूक अन् खात्यात आले 81,00,00,00,00,000 रुपये; खातेदार झाला मालामाल

एचडीएफसी बँक

या बँकेत १ वर्षांसाठी ७.१० टक्के, ३ वर्षांसाठी ७.५० टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५० टक्के व्याज मिळते. २० लाखांची गुंतवणूक केल्यास पहिल्या वर्षाला २१,४५,८२६ रुपये, तिसऱ्या वर्षला २४,९९,४३३ रुपये मिळतील. तर ५ व्या वर्षाला २८,९९,८९६ रुपये मिळतील.

अॅक्सिस बँक

अॅक्सिस बँक ग्राहकांना १ वर्षासाठी ७.२० टक्के, ३ वर्षांसाठी ७.६० टक्के, ५ वर्षांसाठी ७.७५ टक्के व्याज देते. २० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास १ वर्षांसाठी २१,४७,९३५ रुपये, ३ वर्षांसाठी २१,४७,९३५ रुपये, ५ वर्षांसाठी २९,३५,६८६ रुपये रिटर्न देते.

कोणती बँक अधिक व्याज देते?

१ वर्षांसाठी एफडीत बँक ऑफ बडोदा आणि कॅनेरा बँक ७.३५ टक्के व्याजदरासोबत सर्वाधिक रिटर्न देते. कॅनेरा बँक ही ३ वर्षांसाठी ७.९० टक्के इतके सर्वाधिक व्याज देते. ५ वर्षांच्या एफडीचा विचार केला तर अॅक्सिक बँक ७.७५ टक्के इतके सर्वाधिक व्याज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com