Breaking News

Bank Error : बँकेची एक चूक अन् खात्यात आले 81,00,00,00,00,000 रुपये; खातेदार झाला मालामाल

financial error : तुमच्या बँक खात्यात अचानक काही कोट्यवधींची रक्कम आली तर? ही रक्कम जवळपास 81 लाख कोटी एवढी रक्कम असेल तर? जर-तर सोडून द्या. मात्र एका ग्राहकाच्या खात्यात खरंच चुकून एवढी मोठी रक्कम बँकेकडून वळती केली गेली... काय आहे नेमकं प्रकरण... पाहूया....
 bank error
bank Saam tv
Published On: 

आपल्या बँक खात्यावर महिन्याच्या शेवटी पगाराचे पैसे जमा झाले तरी काय आनंद होतो. त्यात जर कुणी तुमच्या बँक खात्यात अचानक हजार नाही, लाख नाही, कोटी नाही तर तब्बल 81 लाख कोटी रूपये टाकले तर.....ही गंमत नाही तर खरचं असं घडलय. तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे प्रत्यक्षात झालं. पाहूया नक्की काय घडलं?

 bank error
Bank Jobs: शिक्षण झालंय? युनियन बँकेत नोकरी करण्याची संधी; २६९१ रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

सिटी ग्रुप बँकेने एका ग्राहकाच्या खात्यात 81 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 81 लाख कोटी रुपये जमा केले. प्रत्यक्षात बँकेला फक्त 280 डॉलर्स म्हणजे 24,492 रुपये पाठवायचे होते. मात्र बँकेच्या जुन्या ऑपरेशनल इश्यूमुळे आणि दोन कर्मचाऱ्यांनी बारकाईनं न पाहिल्यानं 24,492 ऐवजी 81 लाख कोटी रूपये ट्रान्सफर झाले.

बँकेच्या कर्मचाऱ्याने पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याला दुसऱ्या अधिकाऱ्यानेही मंजुरी दिली. पण ही मोठी चूक दोघांच्याही लक्षात आली नाही. सुमारे दीड तासानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना खात्यातील शिल्लक रकमेतील तफावत लक्षात आली आणि चूक उघड झाली. अर्थात सुरक्षा यंत्रणेने ही चूक वेळीच पकडली आणि ती सुधारली गेली.

 bank error
New India Co-operative Bank : 122 कोटींचा झोल! आरबीआयनेही लादले होते निर्बंध, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्हच्या ग्राहकांना कोणता दिलासा मिळाला?

सिटीग्रुपमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच चूक नाही. यापूर्वी 2023 मध्ये अशा चुका बँकेकडून 10 वेळा झाल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्याने चुकून जास्त रक्कम हस्तांतरित केली होती. मात्र या चुका वेळीच दुरुस्त करण्यात आल्या. 2022 मध्ये अशा 13 घटना घडल्या. 2020 मध्येही, सिटीग्रुपने चुकून 900 दशलक्ष डॉलर चुकीच्या खात्यात पाठवले होते. जे परत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली. या चुकीमुळे बँकेचे तत्कालीन सीईओ मायकेल कॉर्बेट यांना राजीनामा द्यावा लागला आणि बँकेला मोठा दंड ठोठावण्यात आला होता.

 bank error
Nashik District Bank : जाचक वसुली विरोधात शेतकरी आक्रमक; एनडीसीसी बँकेचे विरोधात काढला निषेध मोर्चा

आता 2025 मध्ये 81 ट्रिलियन डॉलर्स ज्याच्या खात्यात जमा झाले. त्यानं ते पैसे तत्परतेने काढले नाही. हाच काय तो बँकेला दिलासा. मात्र वारंवार असे प्रकार घडत असल्यानं बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com