

तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर लगेचच ते पूर्ण करून घ्या. कारण आठवड्यात फक्त पाच दिवस बँकिंग सेवा सुरू ठेवण्याच्या मागणीवरून बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
आठवड्यात फक्त पाच दिवस बँकिंग सेवा सुरू ठेवण्याच्या मागणीवरून बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यातील चर्चा अजून निष्फळ ठरणार आहे. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रस्तावित देशव्यापी बँक संपाचा निर्णय कायम ठेवला आहे.
UFBUने दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांचा बँकिंग आठवडा, PLI मधील कथित भेदभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांवर अद्याप समानधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ११ सप्टेंबरचा संप पुढे ढकलण्याचे कारण नसल्याचे संघटनेने स्पष्ट केलं आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप प्रस्तावित आहे. त्यानंतर २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप आणि २६ ऑक्टोबरपासून अनिश्चितकालीन देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. मात्र, पुढील काळात संघटना आणि IBA यांच्यात समझोता झाल्यास या कार्यक्रमात बदल होऊ शकतो.
बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस बँकिंग सेवा सुरू ठेवावी. सध्या दुसरा आणि चौथा शनिवार वगळता इतर शनिवार बँका सुरू असतात. पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्याने शनिवार आणि रविवार सुट्टी राहील. त्याची भरपाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाच्या वेळेत सुमारे ४० मिनिटांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
संप झाला तर बँकांच्या शाखांमधील रोख व्यवहार, चेकशी संबंधित कामे, कागदपत्रांची प्रोसेस आणि इतर प्रत्यक्ष बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र ATM, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगसारख्या डिजिटल सेवा सुरू राहू शकतात. या सेवांवर परिणाम होईल की नाही, हे संबंधित बँकेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.