Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकींच्या खात्यात येणार ₹3,000? लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana August Installment : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळून ३,००० मिळणार का? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हप्ता वितरणाबाबत चर्चेला वेग आला असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
Ladki Bahin Yojana Payment Update
Mazi Ladki Bahin Yojanameta ai
Published On

Ladki Bahin August installment date :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, या पार्श्वभूमीवर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का? असा प्रश्न सध्या अनेक लाभार्थी महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत केली जाते. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू असून, आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ८२ हजार महिलांच्या बँक खात्यांमध्ये २,४३७ कोटी रुपये DBTच्या माध्यमातून जमा करण्यात आल्याची माहिती आहे.

Ladki Bahin Yojana Payment Update
LPG KYC Deadline Extended: LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC ची अंतिम तारीख वाढली, जाणून घ्या नवी तारीख

दरम्यान, आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळतील का, याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा नियमित हप्ता एकत्र जमा झाल्यावर पात्र महिलांना एकाच वेळी ३,००० मिळू शकतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana Payment Update
GDS Bharti 2026: १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच जाणून घ्या प्रोसेस

मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र वितरित करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता ही चर्चेपुरतीच असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

१६ सप्टेंबरनंतर ऑगस्टच्या हप्ता येणार?

मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता टप्प्याटप्प्याने वितरित करण्याची प्रोसेस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही तारीख अधिकृत नसून संभाव्य तारीख म्हणून पाहिली जात आहे. येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने सणाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांना हप्त्याचे पैसे लवकर मिळणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com