Bank Job: या बँकेत तब्बल २४८२ पदांसाठी भरती, पगार मिळेल बक्कळ, पण फक्त यांनाच करता येणार अर्ज

Bank of Baroda Recruitment 2026 : बँकेत काम करण्याची मोठी संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बंँक ऑफिसर पदांच्या २,४८२ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Bank of Baroda Recruitment 2026
Bank of Baroda Recruitment 2026 meta ai
Published On

Bank of Baroda Recruitment 2026 : सरकारी बँकेत काम करण्याची संधी शोधत असाल तर ही माहिती तुमच्याचसाठी आहे. बँक ऑफ बडोदाने (BOB) लोकल बँक ऑफिसर पदांसाठी २०२६ ची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत देशातल्या २० राज्यांमध्ये एकूण २,४८२ पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइ अर्ज करता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतली पदवी घेतलेली असावी. तसेच RBIच्या दुसऱ्या अनुसूचीत समावेश असलेल्या कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बँकेत किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवाराला ज्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे, त्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणं अनिवार्य आहे. वयाची अट २१ ते ३० वर्षे असून आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयात ३ ते १० वर्षांपर्यंत सवलत मिळेल. वय आणि पात्रता १ ऑगस्ट २०२६ रोजी विचारात घेतली जाईल.

Bank of Baroda Recruitment 2026
LPG eKYC : LPG ग्राहकांना दिलासा e-KYC ची तारीख वाढली! घरबसल्या फक्त काही मिनिटांत करा प्रोसेस

कोणत्या राज्यात किती पदे?

गुजरातमध्ये सर्वात जास्त पदे १,१८५, कर्नाटकात ४१८, महाराष्ट्रात २१८, तमिळनाडूत १३५, ओडिशात १०० आणि आंध्र प्रदेशात ८० पदे आहेत. याशिवाय तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब, गोवा आणि इतर राज्यांमध्येही रिक्त पदांची भरती सुरू आहे.

किती मिळणार पगार?

लोकल बँक ऑफिसर हे JMG/S-I स्केल वरील पद आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० रुपये ते ८५,९२० पर्यंत सॅलरी मिळेल. याशिवाय बँकेच्या नियमानुसार विविध भत्ते आणि सुविधा मिळतील. नियुक्तीनंतर उमेदवारांना १२ महिन्यांच्या प्रोबेशनवर ठेवले जाईल.

Bank of Baroda Recruitment 2026
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! यंदा महिलांच्या खात्यात ₹1,500 नाही तर ₹1,750; नेमका निर्णय कोणी घेतला?

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, सायकोमेट्रिक टेस्ट, स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणी (LPT) आणि मुलाखत अशा टप्प्यांत होईल. ऑनलाइन परीक्षेत इंग्रजी भाषा, बँकिंग ज्ञान, सामान्य/आर्थिक जागरूकता, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड या विषयांतील प्रत्येकी ३० प्रश्न असतील. एकूण १२० प्रश्नांसाठी १२० गुण असून परीक्षेचा कालावधी १२० मिनिटे असेल. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांची निगेटिव्ह मार्किंग असेल.

अर्ज शुल्क

सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५०, तर SC, ST, PwBD, ESM, DESM आणि महिला उमेदवारांसाठी १७५ रुपये आहे. अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि आवश्यक इतर कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावी लागतील.

टीप:अर्ज करण्यापूर्वी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत भरती अधिसूचनेतील पात्रता, अर्जाची अंतिम तारीख आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com