Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! यंदा महिलांच्या खात्यात ₹1,500 नाही तर ₹1,750; नेमका निर्णय कोणी घेतला?

Ladki bahin Yojana Installment : लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना यंदा नियमित १५०० रुपयांसोबत रक्षाबंधनानिमित्त अतिरिक्त २५० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे एकूण १७५० रुपये जमा केले जाणार आहेत.
Ladki Behna Yojana
Ladki Behna Yojanameta ai
Published On

सरकार महिलांसाठी नेहमीच महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत असतं. त्यातच लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना या महिन्यात सरकार मोठी भेट देणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. पण रक्षाबंधनामुळे लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर आता थेट १७०० रुपये पाठवले जाणार आहेत. तर ही रक्कम आजच महिलांच्या खात्यात पाठवली जाणार आहे. पण कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बुधवारी मैहर येथे एका राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचा ३९ वा हप्ता महिलांच्या खात्यात बुधवारी पाठवण्यात येईल असं सांगितलं आहे. तर यावर्षी, रक्षाबंधनाच्या निमित्ताने, लाडक्या बहि‍णींना त्यांच्या ठरलेल्या निधीमध्ये २५० रुपये वाढवून दिले जाणार आहेत. राज्यातल्या १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २१४८ कोटींपेक्षा जास्त रुपये पाठवण्यात येतील.

महिलांच्या खात्यात किती रक्कम येईल

मध्य प्रदेशच्या लाडक्या बहि‍णींच्या खात्यात प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात १,५०० रुपये दिले जातात. यासोबतच, रक्षाबंधनासाठी भेट म्हणून २५० रुपये दिले जातील. अशाप्रकारे प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात एकूण १,७५० रुपये पाठवले जातील.

ही रक्कम डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. सरकारच्या म्हणण्यांनुसार, १५०० रुपयांच्या नियमित रकमेसाठी १,८३५.४६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि रक्षाबंधनासाठी भेट म्हणून ३१२.८३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरीत केली जाईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जून २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती. ऑगस्ट २०२६ पर्यंत, या योजनेच्या ३९ हप्त्यांद्वारे पात्र महिलांच्या खात्यात ६३,२४८ कोटींहून जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. सरकारने २०२६ ते २७ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी २३,८८२.८१ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com