Bank Holiday : उद्या बँकेत जाण्याआधी ही बातमी वाचा! २४ नोव्हेंबरला अनेक शहरांत बँका बंद

RBI Holiday List : २४ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेनिमित्त अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
Bank Holiday
Bank Holidaysaam tv
Published On: 

बँकेत काही महत्त्वाचं काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. उद्या म्हणजेच मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी देशातल्या अनेक शहरांमध्ये बँकांना सु्ट्टी असणार आहे. गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रहस पौर्णिमा या सणांमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही राज्यांमध्ये बँक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी आपल्या शहरातल्या सुट्टीची माहिती तपासून घ्या.

२४ नोव्हेंबरला कोणत्या शहरांमध्ये बँका बंद?

RBI च्या सुट्टीच्या यादीनुसार, उत्तर प्रदेशातली लखनऊ आणि कानपूरसह संपूर्ण राज्यात बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. याशिवाय खालील शहरांमध्येही बँकांना सुट्टी असेल.

महाराष्ट्र - मुंबई, नागपूर, बेलापूर मुंबई, नागपूर, बेलापूर

मध्य प्रदेश - भोपाळ

राजस्थान - जयपूर

उत्तराखंड - देहरादून

पश्चिम बंगाल - कोलकाता

दिल्ली - नवी दिल्ली

तेलंगणा - हैदराबाद

ओडिशा - भुवनेश्वर

पंजाब आणि हरियाणा - चंदीगड

झारखंड - रांची

छत्तीसगड - रायपूर

जम्मू-काश्मीर - जम्मू, श्रीनगर

मिझोराम - आइजोल

अरुणाचल प्रदेश - ईटानगर

नागालँड - कोहिमा

हिमाचल प्रदेश - शिमला

Bank Holiday
Gold Investment : घरातलं सोनं न विकताही मिळवा दरवर्षी पैसे! काय आहे ही भन्नाट गोल्ड लीजिंग स्कीम?

या आठवड्यात कधी-कधी बँका बंद राहणार?

या आठवड्यात वेगवेगळ्या सणांमुळे आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँकांचं कामकाज काही दिवस बंद राहणार आहे.

२३ नोव्हेंबर (सोमवार) - सेंग कुट स्नेमनिमित्त मेघालयमध्ये बँका बंद.

२४ नोव्हेंबर (मंगळवार) - गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेनिमित्त अनेक शहरांमध्ये बँकांना सुट्टी.

२७ नोव्हेंबर (शुक्रवार) - कनकदास जयंतीनिमित्त कर्नाटकमध्ये बँका बंद.

२८ नोव्हेंबर (शनिवार) - चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी.

२९ नोव्हेंबर (रविवार) - साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद.

Bank Holiday
WhatsApp Web Security : WhatsApp वापरताय? सावधान! एका चुकीमुळे तुमचे खासगी मेसेज होऊ शकतात लीक

बँका बंद असल्या तरी ऑनलाइन व्यवहार सुरू राहणार?

बँकेच्या शाखांना सुट्टी असली तरी ग्राहकांना डिजिटल बँकिंगचा वापर करता येणार आहे. UPI, IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि ATM सेवा सुरू राहतील. मात्र चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट आणि बँकेच्या शाखेतून होणारी कामे सुट्टीच्या दिवशी करता येणार नाहीत. त्यामुळे बँकेत जाऊन करायचं महत्त्वाचं काम असल्यावर ते आधीच पूर्ण करा किंवा २५ नोव्हेंबर रोजी बँक सुरू झाल्यानंतर करा.लक्षात ठेवा, बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार आणि शहरानुसार बदलतात. त्यामुळे आपल्या बँकेची अधिकृत सुट्टीची यादी एकदा तपासणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.