

घरामध्ये सोनं आहे, पण ते फक्त कपाटात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलंय? मग या सोन्यातूनही तुम्हाला कमाई करता येऊ शकते, हे तुम्हाला माहितीये का? सोनं न विकता त्यातून पैसे मिळवण्याची संधी 'गोल्ड लीजिंग'च्या माध्यमातून मिळते. अगदी घर भाड्याने देऊन पैसे मिळवतो, तसंच सोनं भाड्याने देऊनही कमाई करता येते. पण या पर्यायात फायदा जितका आहे, तितकाच धोकाही आहे.
गोल्ड लीजिंग म्हणजे तुमच्याकडे असलेलं सोनं ठरावीक कालावधीसाठी सराफ किंवा ज्वेलर्सला वापरायला देणं. ज्वेलर्स या सोन्याचा वापर दागिने तयार करण्यासाठी करतात. त्याबदल्यात सोन्याच्या मालकाला ठरावीक परतावा किंवा व्याज देतात. म्हणजेच सोनं विकण्याऐवजी त्यातून नियमित उत्पन्न मिळवण्याचा हा एक पर्याय आहे.
काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर गोल्ड लीजिंग किंवा डिजिटल गोल्डशी संबंधित सुविधा उपलब्ध आहेत. या माध्यमातून गुंतवणूकदारांना साधारण 2.75 ते 4.5 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळू शकतो, असा दावा आहे. पण हा परतावा प्लॅटफॉर्म, करार आणि योजनेनुसार बदलू शकतो.
दागिने तयार करण्यासाठी सराफांना जास्त सोन्याची गरज असते. त्यासाठी सोनं खरेदी करणं किंवा बँकांकडून कर्ज घेणं खर्चिक ठरू शकतं. गोल्ड लीजिंगमुळे त्यांना व्यवसायासाठी सोनं उपलब्ध होतं आणि त्यांच्या खर्चात बचत होऊ शकते.
गोल्ड लीजिंगमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. या सुविधेवर आरबीआयचे थेट नियमन नाही. तसेच बँक ठेवींप्रमाणे DICGC विम्याचे संरक्षणही मिळत नाही. संबंधित प्लॅटफॉर्म किंवा ज्वेलर्स दिवाळखोर झाल्यावर गुंतवलेले पैसे किंवा सोनं परत मिळवायला अडचणी येऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.