

आजकाल जवळपास प्रत्येकजण WhatsApp चा वापर करतो. ऑफिसमधल्या कामापासून ते वैयक्तिक संवादापर्यंत अनेक गोष्टींसाठी WhatsApp चा वापर केला जातो. पण आता WhatsApp वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा सायबर सुरक्षा इशारा दिला आहे. विशेषत: ऑफिसमधल्या कॉम्प्युटर, सार्वजनिक संगणक किंवा इतरांच्या डिव्हाइसवर WhatsApp Web वापरणाऱ्यांनी जास्त काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कारण तुमचं WhatsApp Web अकाउंट लॉगिन राहिल्यावर सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करू शकतात.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या (I4C) नॅशनल सायबरक्राइम थ्रेट अॅनालिटिक्स युनिटने (NCTAU) यासंदर्भात सायबर सुरक्षा सूचना जारी केली आहे. त्यानुसार, एखाद्या व्यक्तीने तुमच्या WhatsApp Web च्या सक्रिय लॉगिन सेशनचा ताबा मिळवल्यास तुमचे खासगी मेसेज वाचता येऊ शकतात.
इतकेच नाही तर तुमच्या नावाने इतरांना मेसेज पाठवणे, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि ग्रुपमधील संभाषण पाहणे, तसेच तुमच्या ओळखीचा वापर करून आर्थिक फसवणूक आणि फिशिंगचे प्रकार केले जाऊ शकतात.
सायबर सुरक्षा सूचनेनुसार, WhatsApp वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
ऑफिसचे गोपनीय काम टाळा : WhatsApp Web वरून सरकारी, आर्थिक किंवा संस्थेशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करू नका.
लॉगआउट करायला विसरू नका : काम झाल्यानंतर WhatsApp Web मधून स्वतः लॉगआउट करा. केवळ ब्राउझरची विंडो बंद केल्याने अकाउंट लॉगआउट होत नाही.
सार्वजनिक कॉम्प्युटर वापरू नका : सायबर कॅफे, हॉटेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या संगणकावर WhatsApp Web वापरणे टाळा.
इन्कॉग्निटो मोड वापरा : गरज पडल्यास विश्वासार्ह कॉम्प्युटरवर Incognito किंवा Private Browsing मोडचा वापर करा. त्यानंतरही लॉगआउट करा.
लिंक्ड डिव्हाइसेस तपासा : WhatsApp च्या Settings मधील Linked Devices पर्यायात जाऊन कोणते डिव्हाइस अकाउंटशी जोडलेले आहे, हे तपासा. अनोळखी डिव्हाइस दिसल्यास त्वरित लॉगआउट करा.
सॉफ्टवेअर अपडेट ठेवा : मोबाईल, कॉम्प्युटर, ब्राउझर आणि सुरक्षा सॉफ्टवेअर नियमित अपडेट करा. अनोळखी फाइल्स डाउनलोड करणे टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.