Bank Holidays
Bank HolidaysSaam Tv

Bank Holiday: कामाची बातमी! आजपासून सलग ४ दिवस बँकांना सुट्ट्या; शाळांचं काय? वाचा सविस्तर

Bank Holidays For 4 Days: बँका आजपासून सलग ४ दिवस बंद असणार आहे. २४ ते २७ जानेवारीपर्यंत बँका बंद असणार आहेत. त्यामुळे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्या बघून जा.
Published on
Summary

आजपासून ४ दिवस बँका बंद

वीकेंड, प्रजासत्ताक दिनामुळे बँकांना सुट्ट्या

२७ जानेवारीला बँकेच्या संपामुळे बंद

बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्व बँका आजपासून बंद राहणार आहे. २४ ते २७ जानेवारी असे एकूण ४ दिवस बँका बंद असणार आहे. बँकांना सुट्ट्या असल्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर जाऊ नका. सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जा. दरम्यान, बँकांसोबतच शाळांनादेखील ३ दिवस सुट्टी असणार आहे. आज शनिवारी अनेक शाळांना सुट्टी असते. उद्या रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांना सुट्टी असणार आहे.

 Bank Holidays
School Holiday: दिल्ली, उत्तर प्रदेशसह या राज्यातील शाळांना १०-१५ दिवस सुट्टी; महाराष्ट्रात काय स्थिती?

देशात २४ आणि २५ जानेवारीला बँकांना शनिवार-रविवारी सुट्टी असणार आहे. त्यानंतर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनामुळे बँक बंद असणार आहे. २७ जानेवारीला बँकांचा संप असणार आहे. त्यामुळे सलग ४ दिवस बँका बंद असणार आहे.

पाच दिवस काम करण्याबाबत निर्णय होत नाहीये, त्यामुळेच बँकांनी संप केला आहे. सलग बँका बंद असल्याने ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे.

२४ जानेवारी

बँकांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्या असतात. त्यामुळेच आज देशातील बँका बंद असणार आहेत.

२५ जानेवारी

२५ जानेवारीला रविवार आहे. त्यामुळे बँका बंद असणार आहे.

२६ जानेवारी

२६ जानेवारीला देशाचा प्रजासत्ताक दिन असणार आहे. या दिवशी सरकारी सुट्टी असते. त्यामुळे बँकेच्या सर्व शाखा बंद असणार आहे.

२७ जानेवारी

२७ जानेवारीला बँका संप करणार आहेत. दर बँकांनी या दिवशी संप केला तर बँका बंद असणार आहेत.

 Bank Holidays
School Holiday: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जानेवारी महिन्यात १० दिवस शाळांना सुट्ट्या; कारण काय?

या सेवा राहणार सुरु

बँक बंद असणार असल्या तरीही ऑनलाइन सर्व्हिस सुरु असणार आहे. तुमचे एटीएम, यूपीआय, मोबाईल बँकिंग या सुविधा सुरुच असणार आहेत. या दिवशी चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट, कॅश काउंटर आणि ब्रँचमध्ये जी कामे होणार आहेत ती होणार नाहीत.

 Bank Holidays
Central Bank Recruitment: सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; ३५० पदांसाठी भरती; पगार १ लाख रुपये; आजच करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com