

उद्या देशातील सर्व बँकांना सुट्टी
१ मे रोजी कामगार दिनानिमित्त सुट्टी
बँकांना सुट्टी तरी डिजिटल सेवा सुरु असणार
उद्यापासून मे महिना सुरु होणार आहे. मे महिन्याचा पहिला दिवस उद्या आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी बँकांना सुट्टी असणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, उद्या देशातील अनेक राज्यातील बँका बंद असणार आहेत. उद्या शेअर मार्केटदेखील बंद असणार आहे.
उद्या NSE-BSE वरदेखील ट्रेडिंग होणार नाहीये. रिझर्व्ह बँकेने उद्या देशातील अनेक राज्यांमध्ये बँक हॉलिडे जाहीर केला आहे. यामागे वेगवेगळी कारणे आहे.
शुक्रवारी १ मे २०२६ रोजी बौद्ध पोर्णिमा आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे. सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरमधील बँका बंद असणार आहे. दरम्यान, बँका जरी बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा सुरु राहणार आहे. सुट्टीच्या दिवशीही यूपीआय, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरु राहणार आहे.
१ मे रोजी बौद्धपोर्णिमा साजरा केली जाते. याचसोबत कामगार दिवसदेखील आहे. कामगारांना त्यांच्या योगदानासाठी आणि अधिकारासाठी हा दिवस साजरा केला जातो. तेव्हापासून या दिवशी राज्यात सुट्टी असते.
मे महिन्यातील इतर सुट्ट्या (Bank Holidays in May 2026)
१ मे- महाराष्ट्र दिन
३ मे- रविवार
९ मे- दुसरा शनिवार
१०मे-रविवार
१६ मे- काही राज्यांमध्ये राज्यदिवसनिमित्त सुट्टी
१७ मे- रविवार देशभरातील बँकांना सुट्टी
२३ मे- चौथा शनिवार
२४ मे- रविवार
२६ मे- काजी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त काही राज्यात बँका बंद
२८ मे- बकरी ईद
३१ मे- रविवार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.