

मे महिन्यात बँका १२ दिवस बंद
सण आणि वीकेंडनिमित्त बँका राहणार बंद
मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी वाचा
मे महिना सुरु होण्यासाठी अवघे ५ दिवस उरले आहेत. मे महिन्यात अनेक नियमात महत्त्वाचे बदल होणार आहेत. जर मे महिन्यात तुमचे बँकेत काही काम असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मे महिन्यातील सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. मे महिन्यात जवळपास १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. अनेक कारणांमुळे बँका बंद असणार आहे.
मे महिन्यात अनेक सण आहेत याचसोबत वीकेंडलादेखील बँका बंद असणार आहे. वेगवेगळ्या राज्यातील सणावारानुसार सुट्टया असणार आहेत. त्यामुळे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी बघून जा.
मे महिन्यात बँकांना सुट्टी किती दिवस? (Bank Holiday List in May 2026)
१ मे शुक्रवार- बुद्ध पोर्मिमा, कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या जाहीर
३ मे रविवार- वीकेंडमुळे संपूर्ण देशात बँका बंद
९ मे दुसरा शनिवार- दुसऱ्या शनिवारी आणि टागोर जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहेत.
१० मे रविवार- संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असणार आहे.
१६ मे- राज्य दिवसनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.
१७ मे रविवार- देशातील सर्व बँकांना सुट्ट्या जाहीर
२३ मे शनिवार- चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
२६ मे मंगळवार- काजी नजरुल इस्लाम जन्मदिवसानिमित्त काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.
२७ मे बुधवार- बकरी ईदनिमित्त जवळपास संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असणार आहे.
२८ मे गुरुवाार- बकरी ईद उल जुहानिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.
३१ मे रविवार- संपूर्ण देशात साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.
१ मेपासून मिळणार लाँग वीकेंड
महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला लाँग वीकेंड मिळणार आहे. १ मे रोजी सुट्टी असणार आहे. त्यानंतर २ मे रोजी शनिवार आणि ३ मे रोजी रविवार असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुट्ट्या मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.