Milk Rate: अमूलकडून देशवाशियांना गिफ्ट; कमी केले दुधासह दुग्धजन्य पदार्थांचे दर, जाणून घ्या नवीन भाव

Amol Milk New Rate : अमूलने आपल्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. 26 जानेवारीपूर्वी जनतेसाठी मोठा दिलासाय. कंपनीने आपल्या तीन वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी केल्यात.
Amol Milk New Rate
Milk RateGoogle
Published On

ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अमूलने आपल्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी करण्याची घोषणा केलीय. कंपनीने आपल्या वेगवेगळ्या तीन दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी केल आहेत. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश या पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांच्या किमतीमध्ये १ रुपयांची कपात करण्यात आलीय. हे दर कमी करण्यापूर्वी अमूल गोल्डची किंमत ६६ रुपये होती.

आता ते ६५ रुपयांना मिळणार आहे. तर अमूल टी स्पेशलची किंमत ६३ रुपयांवरून ६२ रुपये करण्यात आलीय. यापूर्वी अमूल ताजा ५४ रुपयांना मिळत होता. आता ते ५३ रुपयांना मिळणार आहे. ही कपात फक्त १-लिटर पॅकवर लागू असणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दर कपातीची घोषणा केलीय. प्रजासत्ताक दिनापूर्वी जनतेसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

Amol Milk New Rate
Annapurna Yojana: लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार मोफत गॅस सिलिंडर; जाणून घ्या सविस्तर

दर कपातीनंतर कंपनीने त्यामागचे कोणतेही कारण दिलेले नाही. दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर अमूलने पहिल्यांदाच अशी कपात केलीय. आता मदर डेअरीही आपल्या दरात कपात करू शकते, असं सांगितलं जात आहे. GCMMF अमूल डेअरी उत्पादनांचे विक्री करते. हे भारतातील सर्वात मोठे डेअरी फेडरेशन आहे. त्याच्या २१ सदस्य संघटनांसह, ते गुजरातमध्ये दररोज सुमारे ५५ लाख लिटर दुधाची विक्री करते. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मोठ्या प्रमाणात खरेदीदार म्हणून काम करू शकतात.

Amol Milk New Rate
Ayushman Bharat: नागरिकांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्मान भारत योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

रिक्षा-टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ

मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे. तर एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ करण्यात आलीय. येत्या १ एप्रिलपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे. रिक्षा-टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आलीय. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास सामान्य नागरिकांचा खिशाला आणखी कात्री लागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात आता ३ रुपयांची वाढ होणार असून येत्या एक फेब्रुवारीपासून नवा दर लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com