Government: महत्त्वाची बातमी! 'आपले सरकार' पोर्टल पुढील ५ दिवसांसाठी बंद

Aaple Sarkar Portal Shut Down: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आपले सरकार हे पोर्टल पुढील ५ दिवसांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे जर तुमची काही कामे असतील तर ती १४ एप्रिलनंतर करावीत.
Government
GovernmentSaam Tv
Published On

राज्यातील आपले सरकार पोर्टल (Aple Sarkar Portal) अर्थात ई-सेवा केंद्र आजपासून पुढील पाच दिवसांसाठी बंद असणार आहे. म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला काही ऑनलाइन कामे करायची असतील तर ती १४ एप्रिलनंतर करावीत, असं सांगण्यात आले आहे. अनेक शासकीय कामांसाठी आपले सरकार पोर्टल वापरले जाते. परंतु आता पुढचे पाच दिवस हे पोर्टल वापरता येणार नाही.

Government
MSSC Scheme: पोस्टाची 'ही' योजना होणार बंद? मिळतंय भरघोस व्याज; गुंतवणूकीसाठी उरले १५ दिवस

महा ऑनलाइनच्या सर्व्हर मधील नियमित देखभाल आणि तांत्रिक सुधारणांच्या कामासाठी हे बंद राहणार आहे. यामुळे राज्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पाच दिवसांच्या काळात काही तांत्रिक अडचणी दूर केल्या जाणार आहेत. परंतु या काळात जर तुमचे काही ऑनलाइन काम असेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही थेट ५ दिवसांनीच हे अॅप वापरु शकता.

ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सरकारी सेवा,व विद्यार्थ्यांना अति आवश्यक कागदपत्रे उत्पन्न प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलिअर , रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात पडताळणी स्टंटल जात प्रमाणपत्र दुकान पुरवा अशा अनेक कागदपत्रे ई सेवा केंद्र मिळतात विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया यांचा समावेश होतो.केंद्र बंद राहिल्याने या कामांसाठी नागरिकांना पुढील पाच दिवस अडचणींना सामोरे जावे लागणार आहे

Government
New Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना; पुढच्या महिन्यापासून होणार सुरू, काय मिळतील लाभ?

विद्यार्थी,नोकरी शोधणारे आणि ज्यांना आवश्यकता शासकीय कामांसाठी कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.

Government
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, निवृत्तीनंतर दरमहा मिळतील २० हजार रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com