8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनवर काय निर्णय झाला?

Central Government Employees : भुवनेश्वरमध्ये सुरू झालेल्या ८ व्या वेतन आयोगाच्या महत्त्वाच्या बैठकीत वेतनवाढ, फिटमेंट फॅक्टर, डीए आणि पेन्शन सुधारणा यावर चर्चा होत असून अंतिम अहवाल मे २०२७ पर्यंत सादर होण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission
8th Pay Commission meta ai
Published On

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाचं काम आता निर्णय घेण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं आहे. ६ जुलैपासून ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी कर्मचारी संघटना आणि विविध संघटनांच्या सदस्यांच्यासोबत दोन दिवसांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. ही बैठक ७ जुलैपर्यंत चालणार आहे.

आयोगाच्या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा सुरू आहेत?

आयोगाच्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी, महागाई आणि इतर भत्ते, पेन्शनशी संबंधित प्रश्न तसेच कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतर ९ आणि १० जुलै रोजी पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.

8th Pay Commission
8th Pay Commission: फॅमिली युनिटच्या नव्या सूत्रामुळे कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी थेट ६९ हजारांवर? जाणून घ्या सत्य

आठ महिन्यांआधी स्थापन झालेल्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा परिणाम लाखो केंद्रीय, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबांवर होणार आहे. त्यामुळे आयोगाच्या प्रत्येक हालचालीकडे कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

आठव्या वेतन आयोगाने लखनऊ, दिल्ली, लेह, श्रीनगर आणि हैदराबादसह अनेक शहरांमध्ये कर्मचारी संघटनांकडून सूचना आणि मागण्या समजून घेतल्या आहेत. या चर्चांमधून मिळालेल्या सूचना आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. कर्मचारी संघटना यावेळी फिटमेंट फॅक्टर वाढवणे, बेसिक सॅलरीत वाढ, महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची मागणी करत आहेत.

8th Pay Commission
SIP Calculator: फक्त ६००० च्या SIP मधून रिटायरमेंटनंतर महिन्याला ६ लाखांची कमाई? जाणून घ्या संपूर्ण कॅलक्युलेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com