

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सध्या आठव्या वेतनाच्या चर्चा पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहेत. देशातले जवळपास ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ७० लाख पेन्शधारक वेतनवाढीची वाट पाहत आहेत. अशातच कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 'फॅमिली युनिट'च्या नियमात बदल करण्याची महत्त्वाची मागणी केली आहे.
या प्रस्तावानुसार कर्मचारी, नवरा किंवा बायको, दोन मुलं तसेच पालक किंवा गरजू सासू-सासरे यांचाही खर्च विचारात घ्यायला हवा, अशी मागणी आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यावर वेतन ठरवण्याची पद्धतही बदलावी, असं कर्मचारी संघटनांचे म्हणणं आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर फॅमिली युनिट ५ ठरवली तर किमान बेसिक पगारात मोठी वाढ होऊ शकते. काही अंदाजानुसार सध्याचे १८,००० रुपयांचे किमान मूळ वेतन सुमारे २७,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर NC-JCM ने आपल्या प्रस्तावात किमान बेसिक सॅलरी ६९००० रुपये आणि फिटमेंट फॅक्टर ३.८३३ ठेवण्याची शिफारस केली आहे.
बेसिक सॅलरी वाढल्याने त्याचा थेट परिणाम महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TA) यावरही होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.