8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळणार?

8th Pay Commission Arrears From January 1 2026 Latest Update: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळणार का? शिव गोपाल मिश्रा यांचे मोठे विधान, 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी आणि पगारवाढीबाबत जाणून घ्या सविस्तर.
8TH PAY COMMISSION UPDATE
8TH PAY COMMISSION UPDATEai image
Published On: 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांसाठी 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची चर्चा सुरू आहे. वाढीव पगार आणि पेन्शनचा लाभ नेमका कधीपासून मिलबार, असा प्रश्न केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पडला आहे. अशातच नॅशनल कौन्सिल जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या स्टाफ साइडचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी थकबाकीबाबत मोठे विधान केले आहे. कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून एरियर मिळेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

8TH PAY COMMISSION UPDATE
सोसायट्यांच्या लिफ्टसाठी कडक नियम! सर्व्हिसिंग, थर्ड-पार्टी इन्शुरन्सचे नवे आदेश, पाहा A टू Z माहिती

NDTV प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीत शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास उशीर झाला, तरी थकबाकीची गणना 1 जानेवारी 2026 या तारखेपासूनच केली जाईल. या तारखेबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला असून, कर्मचाऱ्यांनी अन्य कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये, असेही म्हटले आहे. मात्र हा कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींचा दावा असून, केंद्र सरकारकडून एरियाबाबत अद्याप अंतिम मंजूरी देण्यात आलेली नाही.

8TH PAY COMMISSION UPDATE
Gold Rate Today: दिलासादायक बातमी! चांदी १ हजारांनी स्वस्त; सराफा बाजारात सोन्याची किंमत किती? पाहा ताजे दर

1 जानेवारी 2026 पासून एरियर मिळणार?

ऑक्टोबर 2025 मध्ये केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची माहिती दिली होती. त्यावेळी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धपत्रकात मागील वेतन आयोगांच्या शिफारशीचा प्रभाव 1 जानेवारी 2026 पासून अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र एरियाच्या प्रत्यक्ष देयकाबाबत कोणतीही स्पष्ट तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे नवीन वेतन आयोग पूर्ण लागू होणार का आणि कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार का, याबाबत संभ्रम कायम आहे.

8TH PAY COMMISSION UPDATE
PPF Vs SSY: पीपीएफ की सुकन्या योजना, २१ वर्षांत कोणती स्कीम तुम्हाला मालामाल बनवणार? पाहा अचूक आकडा

7व्या वेतन आयोगातही मिळाली होती थकबाकी

यापूर्वी 7व्या वेतन आयोगाने नोव्हेंबर 2015 मध्ये आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता. त्यानंतर जुलै 2016 पासून नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आली. मात्र, त्याची तारीख 1 जानेवारी 2016 निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सहा महिन्यांची थकबाकी देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर 8व्या वेतन आयोगातही कर्मचाऱ्यांना एरियर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

8व्या वेतन आयोगात किती महिन्यांचा एरियर मिळू शकतो?

8व्या वेतन आयोगाला मे 2027 पर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे. त्यानंतर केंद्र सरकार या शिफारशींचा आढावा घेऊन त्यांना मंजुरी देईल. त्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला आणखी वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत वेतनवाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्यास कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपेक्षाही अधिक कालावधीचा एरियर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, थकबाकीचा कालावधी आणि एकूण रक्कम याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिसूचनेवर अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.