शिपाईपासून अधिकाऱ्यांपर्यंत पगारात मोठी वाढ होणार, 8व्या वेतन आयोगातील 2.57 फिटमेंट फॅक्टरचे संभाव्य गणित समजून घ्या

8th Pay Commission Salary Hike : 8वा वेतन आयोग लागू झाल्यास 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात किती वाढ होऊ शकते? ₹18,000, ₹35,400 आणि ₹56,100 बेसिक पगाराचे संभाव्य गणित जाणून घ्या.
8th pay commision
8th pay commisionAI Image
Published On
Summary
  • 8व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरमुळे अनेकांच्या मूळ वेतनात वाढ होणार

  • ₹18,000 बेसिक पगारावर 2.57 फॅक्टर गृहीत धरल्यास संभाव्य बेसिक ₹46,260

  • शिक्षक, शिपायांसह पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात नेमकी किती वाढ होणार, याकडे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः फिटमेंट फॅक्टर किती असणार, हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. सातव्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. याच धर्तीवर आठव्या वेतन आयोगातही 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात मोठी वाढ होऊ शकते. मात्र, 2.57 हा सध्या केवळ गृहीत धरलेला आकडा असून, अंतिम फिटमेंट फॅक्टर अद्याप निश्चित झालेला नाही.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे?

नवीन वेतन आयोग लागू करताना जुन्या मूळ वेतनाच्या आधारे नवीन बेसिक पे निश्चित करण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जुन्या बेसिक पगाराला ठरावीक गुणकाने गुणून नवीन बेसिक वेतन निश्चित केले जाते.

8th pay commision
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

शिपायांचा पगार वाढणार

जर 2.57 फॅक्टर गृहीत धरला, तर नवीन बेसिक वेतन = सध्याचे बेसिक वेतन × 2.57 असे गणित असेल. उदाहरणार्थ, लेव्हल-1 मधील कर्मचारी म्हणजेच शिपाई किंवा एमटीएस कर्मचाऱ्यांचे सध्याचे बेसिक वेतन ₹18,000 आहे. 2.57 फॅक्टरनुसार ते ₹46,260 होऊ शकते. म्हणजेच बेसिकमध्ये ₹28,260 ची संभाव्य वाढ होईल.

8th pay commision
Kidney Stone : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? ३० दिवस आधी दिसतील 'ही' लक्षणे, दुर्लक्ष कराल तर....

शिक्षकांच्या वेतनात वाढ

लेव्हल-6 मधील शिक्षकांचे बेसिक वेतन ₹35,400 असल्यास ते ₹90,978 पर्यंत जाऊ शकते. तर लेव्हल-10 मधील अधिकाऱ्यांचे ₹56,100 बेसिक वेतन 2.57 फॅक्टरनुसार ₹1,44,177 होऊ शकते. याशिवाय DA, HRA आणि TA यांसारखे भत्ते मिळत असल्याने एकूण पगाराची रक्कम आणखी वेगळी असू शकते. मात्र, नवीन वेतन आयोग लागू करताना भत्ते आणि DA संदर्भातील नियम बदलू शकतात.

8th pay commision
Ganga River : देशात ४०० नद्या पण 'या' नदीला राष्ट्रीय महत्त्व का? ९९% लोकांना माहितीच नाही

पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ

पेन्शनधारकांनाही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, ₹9,000 किमान पेन्शनवर 2.57 फॅक्टर लावल्यास ती ₹23,130 होऊ शकते. मात्र, वेतनवाढ, नवीन वेतनश्रेणी, भत्ते आणि पेन्शनमधील बदल याबाबत अधिकृत निर्णय झाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com