Budget 2024: अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा होणार? आयुष्मान भारत योजनेची मर्यादा १० लाख होण्याची शक्यता

Ayushman Bharat Health Insurance Scheme: अनेकवेळा उपचारासाठी पैसे नसल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेतील विम्याची रक्कम आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Budget 2024
Budget 2024Saam TV
Published On

Budget 2024:

साल २०२४ सुरु होताच यंदाच्या अर्थसंकल्पात काय बदल असणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत सर्व गरजू व्यक्तींना विमा संरक्षण दिलं जातं. हे संरक्षण आता दुप्पट होण्याची शक्यता आहे. आगामी अर्थसंकल्पात आयुष्मान भारत या योजनेकडे सरकारचे लक्ष आहे.

Budget 2024
Halwa Ceremony Budget 2024: बजेटच्या आधीच वाटला जातो हलवा, काय आहे हलवा सेरेमनीचं महत्व? जाणून घ्या एका क्लिकवर

पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. आरोग्याशी संबंधित आजारांवर मात करण्यासाठी नागरिकांना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते. अनेकवेळा उपचारासाठी पैसे नसल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेतील विम्याची रक्कम आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्रालय आयुष्मान भारत योजनेअंतर्गत २०२३-२४ पासून प्रति कुटुंब ही रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र कर्करोगासारख्या उपचारांसाठी ही रक्कम फर कमी पडते. त्यामुळे या अर्थसंकल्पात विम्याची रक्कम १० लाख रुपये कसे करता येईल यावर काम सुरू आहे.

आयुष्मान भारत योजना नागरिकांसाठी साल २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. गरीब आणि गरजू व्यक्तींच्या आरोग्य कवच असं या योजनेचं मुख्य उद्दिष्ट्य आहे. सध्या आयुष्मान भारत अंतर्गत असलेली जन आरोग्य योजना सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते.

आतापर्यंत देशभराती ५५ कोटी व्यक्ती या योजनेशी जोडले गेलेत. अनेक राज्यांसह केंद्रशासीत प्रदेशांत ही योजना राबवली जात आहे. २० डिसेंबर २०२३ पर्यंत योजनेअंतर्गत साधारण २८.४५ कोटी आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत.

Budget 2024
Pune Crime News : फक्त बघितलं म्हणून टोळक्याचा अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला; सहकारनगरमधील थरारक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com