देशाच्या नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार आहे. १ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन या सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाआधी हलवा सेरेमनी केली जाते. या हलवा सेरेमनीबद्दल जाणून घेऊयात. (Latest Marathi News)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या जाणार नाहीत'. संसदेत सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाआधी हलवा सेरेमनी केली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मोदी सरकारच्या कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व भारतीयांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे. याच अर्थसंकल्पाआधी अर्थमंत्री आणि या अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये हा हलवा वाटला जातो. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हलवा सेरेमनीची परंपरा स्वातंत्र्यानंतर सुरु झाली. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याआधीच हलवा सेरेमनी केला जातो. या सेरेमनीसाठी अर्थ मंत्रालयातील सर्व अधिकारी उपस्थित राहतात.
अर्थसंकल्पातील कोणतीही गोपनीय माहिती लीक होऊ नये, यामुळे अर्थ मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना थांबण्यास सांगितलं जातं. जोपर्यंत अर्थसंकल्प होत नाही, तोपर्यंत त्यांना थांबावं लागतं. यासाठी हलवा सेरेमनी केली जाते.
अर्थसंकल्पाचं काम पूर्ण झाल्यावर अर्थ मंत्रालयाच्या १० नॉर्थ ब्लॉक येथे हलवा तायर केला जातो. हलवा तयार केल्यानंतर अर्थमंत्रालयातील कर्मचारी, छपाई करणारे कर्मचारी, अधिकारी यांना हलवा वाटला जातो. शुभ काम करण्यापूर्वी गोड खाल्लं पाहिजे, असं म्हटलं जातं. त्यानुसार या हलवा सेरेमनीचं आयोजन केलं जातं असंही काही जणांचं म्हणणं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.