Young man train fall video viral saam tv
व्हायरल न्यूज

Watch Video: रात्री ट्रेनच्या दारात उभा राहिला, खाडी आल्यावर तोल गेला अन्...! अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Young man train fall video viral: रेल्वेतून प्रवास करताना एका युवकाचा तोल गेला आणि तो थेट खाडीत पडला. हा प्रसंग पाहून प्रवाशांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला आणि काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Surabhi Jayashree Jagdish

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर एक थरारक आणि हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली. यामध्ये धावत्या ट्रेनमधून एक तरुण थेट वैतरणा खाडीच्या पात्रात पडल्याची दुर्घटना घडली. या घटनेत स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले असून अनेकांनी या बचावकार्यात सहभागी झालेल्यांचं कौतुक केलं आहे.

उद्यन वांगड असं या तरुणाचं नाव असून तो बोईसरमधील रहिवासी आहे. रात्रीच्या सुमारास तो पश्चिम रेल्वेच्या लोकलने प्रवास करत होता. डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावरून परत बोईसरकडे येत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि पाय घसरल्याने तो धावत्या ट्रेनमधून थेट खाली पडला. यावेळी तो ज्या ठिकाणी पडला ते वैतरणा खाडीचं खोल पात्र होतं.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

क्षणभरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. व्हिडीओमध्ये दिसतं की, खाडीत पडल्यावर उद्यनने प्रसंगावधान राखत जवळच असलेल्या पिलरच्या बांधकामाचा आधार घेत स्वतःला तरंगत ठेवण्याचा प्रयत्न केला. अंधार, पाणी आणि भीतीदायक परिस्थिती असूनही त्याने धीर सोडला नाही. यावेळी जीव वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने न करता बोट घेऊन खाडीच्या दिशेने धाव घेतली. जीवाची पर्वा न करता त्यांनी पाण्यात अडकलेल्या उद्यनपर्यंत पोहोचत त्याला सुरक्षित बाहेर काढलं. हा संपूर्ण बचावप्रसंग कॅमेरात कैद झाला आहे.

या दुर्घटनेत उद्यन जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या तरुणासाठी स्थानिक मदतनीस देवदूतच ठरलेत, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra MIDC : बारामतीजवळ १००० एकरमध्ये एमआयडीसी, हजारो लोकांना रोजगार मिळणार, अजितदादांचे स्वप्न साकार

Mahashivratri 2026 Jalabhishek: महाशिवरात्रीला राशीनुसार करा शिवलिंगावर अभिषेक; ग्रह दोष होणार दूर

Pune Accident: नगर- कल्याण महामार्गावर अपघाताचा थरार, सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १५ जण जखमी

Viral Video : जंगलात राहतो, झाडांचा पाला खातो; बेळगावात फिरतोय आधुनिक टार्जन, काय आहे नेमका प्रकार?

Beauty With Brain! 24 वर्षांची अभिनेत्री झाली डॉक्टर, MBBSची Degree पाहून चाहते हैराण

SCROLL FOR NEXT