ऑफिसमध्ये लफड्यांचा बाजार, डेस्कवर डेटिंग, जोडीदाराला वेटिंग

From Desk Partners to Love Partners: तुमच्या ऑफिसमध्येही एखादं जोडपं गुपचूप डेटिंग करतंय का? सध्या ऑफिसमध्ये केवळ टार्गेटच नव्हे, तर 'लफड्यांचा' टक्काही तितक्याच वेगाने वाढतोय. असं आम्ही नाही फोर्ब्सचा सर्वे सांगतोय. पाहा, कॉर्पोरेटमध्ये सुरू असलेल्या अफेअ मोठा खुलासा...
Office relationships are on the rise, blurring the line between professional and personal life.
Office relationships are on the rise, blurring the line between professional and personal life.saam tv
Published On

प्रत्येक ऑफिसमध्ये.. होय प्रत्येक ऑफीसमध्ये एक ना एक कॉर्पोरेट कपल असतंच. हे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑफीसमधलं डेस्कवर डेटिंग करणारं एखादं कॉर्पोरेट कपल आठवलं असेलही परंतू आता प्रत्येक ऑफीस मधल्या प्रोजेक्ट पार्टनर पासून पर्सनल पार्टनर बनलेल्यांची भली मोठी यादीच आज फोर्ब्सनं केलेल्या एका ताज्या सर्व्हेतून समोर आलीये. जसं ऑफीसमध्ये कामाचा ताण, डेडलाईन्स आणि टार्गेट सध्या वाढत चाललंय अगदी तसंच सोबतच ऑफीस अफेअर्सचं प्रमाण किती वाढलंय तेही पाहा.

https://www.youtube.com/watch?v=uRSUQRKgxvU60% कर्मचाऱ्यांचे ऑफिसमध्ये अफेअर्स

40% लोकांकडून जोडीदाराची फसवणूक

65% लोकं कम्फर्टमुळेच प्रेमात

61% लोकांना बाहेर भेटायला वेळच नाही

या आकडेवारीनं लॉग आऊट जोड्यांचे धाबे दणाणलेत. हे अफेअर्स केवळ आकर्षणापुरते उरलेले नसून, आता या कॉर्पोरेट मजनूगिरीचा परिणाम थेट कामावर आणि करिअरवर होऊ लागलाय. या ब्रेक पार्टनर्समुळे अनेक कंपन्यांनी आपली गुणवत्ता ढासळू नये म्हणून काही कडक नियम करण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी जब जब प्यार पे पेहरा लगा है प्यार और गहरा हुआ है हे सडक सिनेमातलं गाणं तुम्हाला माहितये.. त्यामुळे या कॉर्पोरेट कपल्सचे किस्से इतर सहकारी अगदी चवीनं चर्चेत आणतात.. आणि त्याच्या अफेअर्सचे बरे वाईट परिणामही होतात, पाहा,

57% लोकांच्या कामावर वाईट परिणाम

50% लोकांकडून सहकाऱ्यांसोबत छेडछाड

35% लोक कंपनीपासून नातं लपवतात

43% अफेअर्सचं रूपांतर लग्नात

ही आकडेवारी विचार करायला लावणारीये.ऑफीसमधले प्रोजेक्ट पार्टनर कधी पर्सनल पार्टनर होतील याची कुणालाही शाश्वती नाही. पण एक चुकीचा निर्णय तुमच्या वर्षांनुवर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकतो. असा इशारा फोर्ब्सनं दिलाय. त्यामुळे कामाच्या ठिकाणी असलेलं हे नाजूक गुलाबी नातं तुमच्या करिअरचा गेम तर करणार नाही ना? याची काळजी प्रत्येक कॉर्पोरेट कपलनं घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com